Crime | वाढदिवसाच्या केकवरुन वाद; मित्रानेच मित्राचा केला घात

0
26

Crime | जीवाला जीव देणारे, प्रसंगी पाठिशी ठामपणे उभ राहणारे, आपल्याच आनंदात जास्त  आनंदी होणारे मित्र हा आयुष्यातील अनमोल ठेवा असतो. हेच मित्र आपली शेवटपर्यंत साथ देतात. आपलं दु:ख वाटून कमी करतात आणि आनंदांच्या गोष्टी सेलिब्रेट करून तो आनंद वाढवत असतात. प्रत्येकालाच असे मित्र मिळतात असं नाही, काही मित्र असे असतात, जे असण्यापेक्षा शत्रू असलेले परवडतात. स्वत:च्या रागापायी, शुल्लक गोष्टी मनात ठेवून अबोला धरणारे किंवा सगळ्यात वाईट म्हणजे याच रागातून तुमचं वाईट चिंतणारे मित्र शत्रुपेक्षा कमी नसतात. (Crime)

IND vs AFG | थोड्याच वेळात अफगाणविरोधात भारताचा सामना; गिलच्या जागी ईशान निश्चित

मैत्रीचा असाच एक वाईट शेवट उल्हासनगरमध्ये घडलेला आहे.  कॅम्प 2 मधील खेमानी परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे. मित्रानेच मित्राचा घात करत त्याचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जेवण करून घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पोटात चाकू  खुपसला होता. या सगळ्यात एक तरूण जखमी झाला होता. त्या तरुणाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली आहे. मात्र त्याच्या मृत्यूला त्याचा मित्रच जबाबदार ठरला आहे.

ठाण्यातील उल्हासनगर कॅम्प २ मधील खेमानी परिसरातील राहणारा ‘प्रदीप वर्मा’ हा तरूण 26 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर बाहेर शतपावली करण्यासाठी बाहेर पडला. पण तेवढ्यात एका अल्पवयीन तरूणाने त्याच्या पोटात चाकू खुपसल्यामुळे तो गंभीर जखमी झालेला होता. उपचारांसाठी त्याला तातडीने उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या १३ दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र त्याची ही झुंज अखेर थांबली आहे. उपचारांदरम्यान प्रदीपचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे. एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवाणनगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिलेली आहे.

Nashik | नाशकात दुधाचा मोठा साठा केला जप्त; गायीच्या दुधातदेखील भेसळ सुरु

आमचा मुलगा प्रदीपच्या एका मित्राचा वाढदिवस होता. जवळच्या चौकात वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येणार होता. पण प्रदीप हा त्यावेळी तिथे गेला नाही. याच गोष्टीचा राग मनात ठेवून दोन अल्पवयीन मुलांनी आमच्या मुलाची हत्या केली आहे असा आरोप प्रदीपच्या कुटुंबियांनी केलेला आहे. याप्रकरणात अद्याप एकालाच ताब्यात घेतले असुन या खुनामागे आणखी कोणाचा हात आहे हे शोधून इतर आरोपींनाही अटक करावी.  त्याशिवाय आम्ही मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा वर्मा कुटुंबीयांनी दिलेला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here