Raj Thackrey | … तर टोलनाके जाळून टाकू; राज ठाकरेंचा इशारा

0
20

Raj Thackrey | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात टोलनाक्यांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरलेला आहे. मनसेच्या काही पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुद्दा मांडण्याची भूमिका देखील जाहीर केलेली आहे. यासंदर्भात आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमाद्वारे आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारला राज्यातील टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी दिला. (Raj Thackrey)

नक्की काय म्हणाले राज ठाकरे?

“गेल्या चार दिवसांपासून मनसे नेते अविनाश जाधव व बाकीचे सहकारी ठाण्यात पाच ठिकाणी झालेल्या टोलदरवाढीच्या विरोधात उपोषणाला बसलेले होते. मला राज्य सराकरकडून एक पत्र आलेलं आहे. त्या पत्रात सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. कुणाकुणाला टोल नाहीये, कुणाला टोल आहे या संदर्भात त्यात लिहिलं होतं. टोलचा सगळा पैसा कॅशमध्ये असतो. हा पैसा कुठे जातो? याचं काय होतं? त्याच त्याच कंपन्यांना हे टोल कसे मिळतांय? त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हा पैसा कुठे जातो? आपण रोड टॅक्स भरतो, तो कुठे जातो? हे कुणालाही कळत नाही आहे. अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्या वाट्याला येत आहेत”, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलमुक्त महाराष्ट्रसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांच्या व्हिडीओक्लिप्स माध्यामांना ऐकवल्या. आधी सेना-भाजपा युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी होती. आत्ता काय परीस्थिती आहे त्याचं काय मातेरं झालेलं आहे हे कुणालाच माहिती नाही.तेव्हा हे पक्ष काय म्हणाले ते मी एकेक मिनिटाच्या व्हिडीओक्लिपवरून दाखवतो. त्यातही नेतेमंडळी आपलं सरकार आल्यानंतर किंवा अमुक तारखेपर्यंत महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासंदर्भात दावे करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्याकडे दर आठवड्याला, दर दिवसाला टोलचे पैसे जात असतात. हे सगळे एवढ्या थापा मारतात, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Big News | ठरलं तर! शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांच्या गाड्या अडवणार

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रविवारी माध्यमांशी बोलताना फक्त कमर्शियल गाड्यांनाच टोलदर आकारणी होत असल्याच्या केलेल्या विधानावरही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. “हे धादांत खोटं आहेत. जर टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू, तर हे पैसे कुठे जातायत? टोल हा राज्यातला सर्वात मोठा स्कॅम आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे. त्यांचं काय उत्तर येतंय ते बघू. नाहीतर आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी सांगिलंय की चारचाकी, दुचाकींना टोलदर नाही. मग आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभं राहून चारचाकींना टोलदर भरू देणार नाही. त्याला जर त्यांनी विरोध केला तर आम्ही हे सगळे टोलनाके जाळून टाकू अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here