Civil hospital: नांदेड आणि संभाजी नगर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज रोजी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक शासकीय वैद्यकीय रुग्णालयास भेट दिली. यावेळी रुग्णांची भेट घेवून विचारपूस करत त्यांची चौकशी केली. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी काही बाबी निदर्शनास आल्यात त्यात स्वच्छ्ता तसेच काही लिफ्ट बंद आढळल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या यंत्रणेला मंत्री भुसे यांनी सूचना केल्या आहेत. (Civil hospital)
Entertainment | ‘इंटरनॅशनल फालमफोक’ २७ ऑक्टोबरपासून सर्व महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
रुग्णालयातील औषध साठा देखील एक महिना पुरेल इतका आहे. त्याचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रयत्नशील असून लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून औषध साठा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मंत्री भुसे यांनी केले. रुग्णांना कुठलेही गैरसोय व्हायला नको प्रत्येकाला दर्जेदार उपचार मिळायला हवेत यासाठी शासन कटिबध्द आहे. नागरिकांना उपचारात कसूर व्हायला नको अशा सूचना देखील भुसे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. (Civil hospital)
येत्या आठवड्याभरात रुग्णालयाबाबत लवकरच बैठक घेवून समस्यांचे निराकरण केले जाईल. रुग्ण बरा होणे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने आरोग्य यंत्रणा कसे काम करेल याबाबत काही उपाययोजना करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. तसेच रुग्णालय परिसरात स्वच्छता कायम स्वरुपी ठेवण्याचे निर्देश यावेळी केले. रुग्णालयात काही बाबींची कमतरता असल्यास कळविण्याचे आवाहन देखील भुसे यांनी यावेळी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम