द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देशात सध्या गांजा, ड्रग्स, माफियांचा सुळसुळाट वाढला असून, महाराष्ट्रात गुटखा बंद असतांना अवैधरित्या गुटखा वाहतुक व विक्री सुरू आहे. अवैध रित्या वाहतुक होत असताना पोलिसांकडून तात्पुरती का असेना मात्र कारवाई केली जाते. दिवाळीत चिवड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुरमुऱ्याच्या पोत्यातून गुटख्याची तस्करी होत असतांना पोलिसांना याचा सुगावा लागला. अन रंगेहाथ पकडण्यात आले, यामुळे दिवाळीत चिवडा बाजूला राहिला अन शौकिनांना गुटखा आल्याची चर्चा सुरू झाली..
धुळे येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातर्फे कारवाईत करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे, यात दोघांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी केलेल्या कारवाईने माफियांनी धसका घेतला आहे.
आज झालेल्या कारवाईत एलसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज कारवाई करण्यात आली. यावेळी मुरमुऱ्याच्या पोत्याआडून विमल गुटख्याची तस्करी होत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी वाहनासह माल जप्त केला आहे. तर दोघांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
शेतमाला साठी वापरण्यात येणाऱ्या पीकअप मधून गुटखा नेण्यात येत होता. याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धुळे ते साक्री दरम्यान कसून शोध मोहिम राबविली अन यात . म्हसदीहून नेरकडे येणाऱ्या पिकअप एम.एच.18, बीजी, 4611 या वाहनाचा संशय आल्याने पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली.
वाहन चालकाने मुरमुऱ्याचे पोते घेवून जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहन तपासणी केली असता त्यात मुरमुऱ्याच्या पोत्याआड विमल गुटख्याची पाऊच असलेले पोते वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांना माहिती पक्की असल्याने ही तस्करी उधळून लावली.
धुळे एलसीबी पथकाने वाहनासह माल धुळे येथील कार्यालयात आणला या कारवाईत जवळपास 8 लाख 77 हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच याप्रकरणी वाहनातील दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत असून कारवाई कडक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम