Laser Show | लेझरने दिला डोळ्यांत न मावणारा अंधार ! 

0
32

नाशिक : Laser Show |गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझर लाइटचा वापर तरुणांच्या डोळ्यांवर बेतू लागलेला आहे. डोळ्यांच्या दृष्टिपटलावर म्हणजेच रेटिनावर रक्तस्राव होऊन काही तरुणांना एका डोळ्याने दिसण्यात गंभीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शहरात आतापर्यंत सहा तरुणांमध्ये हा दृष्टिदोष आढळला आलेला आहे. लेझर लाइटच्या संपर्कात आलेल्या आणखी काही रुग्णांमध्ये त्याचे निदान होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी(दि.२८ ऑक्टोबर) गणेश विसर्जन पर पडलं.यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत अफाट गर्दी पाहायला मिळाली.यंदा मिरवणुकीत डीजे साठी परवानगी नसताना सर्रास डीजेचा वापर करण्यात आला.(Laser Show)

Nashik News | नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत होण्याची दिसतांय चिन्हं

नेमके घडलं काय ?

शहरातील काही नेत्रविकार तज्ज्ञांकडे विशी-पंचविशीतील तरुण दृष्टिदोषाची तक्रार घेऊन आले. त्यांची नजर कमी झाल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आलं. त्यानंतर नेत्रपटल तपासण्यात आले. नेत्रपटलावर रक्त साचले होते. याशिवाय त्यावर भाजल्यासारख्या जखमाही आढळल्या. या रुग्णांच्या डोळ्यांना ना मार लागला होता, ना त्यांनी वेल्डिंग बघितले होते. परंतु, गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर शोसमोर नाचल्याची माहिती या तरुणांनी डॉक्टरांना दिली. रेटिनाच्या ओसीटी स्कॅनमध्ये डोळ्याच्या मागील पटलावर मोठा दृष्टिदोष आढळल्याची माहिती नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. गणेश भामरे, डॉ. सचिन कासलीवाल यांनी दिली.

 

डॉक्टरांची दर्शवलेली निरीक्षणे…

 

• डोळा कायमस्वरूपी गमावण्याची भीती

• नेत्रपटलावर लेझर बर्न क्वचितच आढळतात

• डीजे आणि लेजर लाईट वर पूर्णतः बंदी करण्यावर जनजागृती करणार

Maharashtra News | राज्य सरकार तयार करेल जागा भाड्याचे नवे नियम

एका तरुणाच्या डोळ्याच्या मागील पटलावर घातक दृष्टिदोष आढळला. हा तरुण विसर्जन मिरवणुकीत डीजेसमोरील लेझर लाइटच्या संपर्कात आला होता.- डॉ. अमित घांडे, नेत्रविकार तज्ज्ञ

नाशिकमध्ये आतापर्यंत सहा रुग्ण आढळले असून, धुळे, मुंबई, ठाण्यातही असे रुग्ण आढळल्याचे तेथील नेत्रविकार तज्ज्ञांनी कळविले आहे. राज्यात असे रुग्ण मोठ्या संख्येने असू शकतात. नेत्रविकार तज्ज्ञ संघटनेच्या पातळीवर याबाबत जनजागृती करणार आहेत.- डॉ. सचिन कासलीवाल

या संदर्भात जास्त माहिती देण्यासाठी नाशिकच्या नेत्र रोग संघटनेने पत्रकार परिषद आयोजित केली आहे.नाशिक येथील आयएमए सभागृहात ही पत्रकार परीषद होणार आहे.नेत्र रोग तज्ञ यासंदर्भात माहिती देणार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here