द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक जिल्ह्यात तालुका स्तरावर लोकसंख्याच्या आधारावर आधार केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांनी जिल्हाधीकाऱ्यांकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यात तालुका स्तरावर लोकसंख्याच्या आधारावर आधार केंद्राची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांनी उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि सद्य परिस्थितीत नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या हि ६५,३४,९८१ आहे. (Estimates as per Aadhar uidai.gov.in Dec 2020 Data ) नाशिक जिल्हा हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना नाशिक जिल्ह्यामध्ये आधार केंद्र फक्त १४५ आहे. त्याततही काही आधार केंद्र बंद पडले आहे. महाराष्ट्र शासनाचे ज्या काही योजना असता त्यांच्या उपभोग घेणेसाठी आधार केंद्र असणे व विवाहानंतर नावामध्ये, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल हे आधार कार्ड वर अद्यावत करणेसाठी दुरुस्ती करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे नवीन जन्मलेल्या व पाच वर्षावरील बालकांचे आधार नोंदणी करावे लागते असे असतांना तुटपुंज्या आधार केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
दिवसाला ३० व्यक्तीचे आधार नोंदणी व दुरुस्ती केली जाते. ऑनलाइन अँपॉईटमेंट घेऊन दोन महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची आधार नोंदणी व दुरुस्ती वेळेवर झाली नाही तर शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे नवीन आधार केंद्राला तात्काळ मान्यता देण्यात यावी व लोकसंख्या नुसार आपल्या स्थरावरून आधार केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी.
आपल्या स्तरावर नागरिकांना सहकार्य होईल अशी आशा व अपेक्षा करतो वरील गंभीर समस्या लक्ष्यात घेता नागरिकांच्या सोयीसाठी आपण सर्वोत्तपरी सहकार्य करावी अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे वतीने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे , उपाध्यक्ष प्रतीक रायते , गौरेश सूर्यवंशी , सरचिटणीस अनिल गोसावी , शुभम मुरकुटे , निखिल निकम , चिटणीस विशाल लभडे, बागलाण तालुकाध्यक्ष प्रीतश भदाणे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम