Nashik road: नाशिक रोड ते द्वारका हा पुणे-नाशिक, राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग असून त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वाहतुकीसह अवजड वाहतूक होत असते. या विषम वाहतुकीमुळे या 7 किमीवर अंतरावर नेहमीच अपघात आणि गर्दी होते. हे लक्षात घेवून नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून ही कोंडी सोडविण्यासाठी डबल डेकर फ्लायओव्हरची अंतिम मंजुरी तसेच निधी तातडीने मिळून काम सुरू होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. (Nashik road )
It job: नोकरी नाही चिंता सोडा IT कंपन्यांकडून, 5 महिन्यांत 50,000 फ्रेशर्सना मिळणार नोकऱ्या
द्वारका ते नाशिकरोड याठिकाणी महा-मेट्रोने निओ मेट्रोचा प्रस्ताव तसेच उड्डाणपूलाचा प्रस्ताव NHAI ने दिला आहे त्यामुळे दोन्हींची सांगड घालून डबल डेकर फ्लायओव्हर होणे गरजेचे आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र थांबणार आहे. द्वारका सर्कलमध्ये सतत गर्दी होत असते, रेल्वेस्टेशन, पुणे तसेच मुंबई – आग्रा हायवेला जोडणारे हे सर्कल असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच उद्भवत असते. (Nashik road )
द्वारका ते नाशिकरोड हा भाग भारत सरकारच्या सागरमाला योजनेत समाविष्ट असून , सागरमाला प्रकल्प हा भारत सरकारचा एक व्युहात्मक व ग्राहकाभिमुख प्रकल्प आहे, यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेणे अत्यावश्यक आहे. महामेट्रोकडे मेट्रोची अंतिम मंजुरी प्रस्तावित असून डबल डेक्कर पुलाच्या मंजूरी बाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विनंती केली आहे. (Nashik road )
नाशिकरोड – द्वारका या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास नाशिककरांची वाहतूक कोंडीची वाताहात थांबणार आहे. नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सक्रिय होत या योजनेसाठी वेळोवेळी NHAI च्या अधिकाऱ्यांशी पालकमंत्री या नात्याने बैठका घेत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.(Nashik road )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम