Student beating : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगच्या नावाखाली अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर (Social Media) व्हायरल झाला असून हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाच तितकंच भीतीच वातावरण पसरल आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या मैदानावर बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना एकत्रित पणे एनसीसीच प्रशिक्षण (NCC Training) देण्यात येत होत. या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. आर्मी आणि नेव्ही चे प्रशिक्षण असल्याने विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाली तर त्यांना त्यासाठी शिक्षा देखील करण्यात येते. मात्र, विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने अमानुष मारहाण करत शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
https://thepointnow.in/rape-murder/
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसी बाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत असल्याच देखील समोर आलं आहे.
महाविद्यालयाचे स्पष्टीकरण
सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी स्पष्टीकरण देत, ज्याने विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली तो विद्यार्थी असून तो विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. बुधवारीच या घटनेबाबत चौकशी साठी विद्या प्रसारक मंडळाकडे कारवाईसाठी पाठवले गेले होते. एनसीसीने आतापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी केल्या असून प्रशिक्षणा दरम्यान घटनास्थळी शिक्षक (Teacher) उपस्थित नसताना हा प्रकार घडलाय.
त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याचबरोबर असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी एका समितीची स्थापना आम्ही करत आहोत.(ncc)
दरम्यान असा कोणताही प्रकार कोणत्याही विद्यार्थ्यांबरोबर झाला असेल किंवा होत असेल तर त्यांनी अजिबात घाबरू नये. व आम्हाला येऊन भेटावं. दहशद माजवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीसी सोडण्याचा अजिबात विचार करु नये,” असेही प्राचार्या नाईक यांनी सांगितले आहे.(student beating)
दरम्यान ठाण्यामध्ये उघडलेला हा प्रकार अतिशय संताप जनक असून विद्यार्थ्यांना ट्रेनिंगच्या नावाखाली मारहाण करण्यात येत असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोषच वातावरण निर्माण झाला आहे. यामुळे यापुढे असे प्रकार घडणार नाही याची दक्षता महाविद्यालयाने घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम