देवळा : राज्यात मंगळवारी दि १ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या महसूल सप्ताहा निमित्त आज बुधवार दि २ रोजी देवळा येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ” एक हात मदतीचा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महसूल उपआयुक्त रमेश काळे , विठ्ठल सोनवणे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती माया पाटोळे आदी उपस्थित होते .सदर कार्यक्रमास तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसिलदार विजय सूर्यवंशी यांनी दिव्यांग बांधवांसाठीच्या शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली .
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते १५ नविन दिव्यांग लाभार्थीच्या संजय गांधी योजनेच्या प्रस्तावांना मंजुरीचे आदेश देऊन त्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या . दिनांक १ ऑगस्ट रोजी मसुल दिन म्हणून म ज म १९६६ चे कलम १५५ अंर्तगत ७ लाभार्थ्यांना आदेश पारीत करण्यात आले .तसेच गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी ८ ड ,७/१२ उताऱ्यावर नोंद घेऊन आदेश पारीत करण्यात आले .महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागातील उत्कृष्ठ कामगिरी बजावनाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमास नायब तहसीलदार ,मंडळ अधिकारी, तलाठी ,कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी केले .आभार दिनेश शेलुकर यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम