National crime : डॉक्टरी पेशाच्या नावाखाली तो करत होता देशद्रोही कारवाया ; मराठी तरुणांना दहशदवादी संघटनेत भरती करणारा तो अखेर जाळ्यात

0
22

National crime : संपूर्ण जगामध्ये दहशतवादाचे पाळीमुळे रोवणाऱ्या इसीस( ISIS) या दहशतवादी संघटनेमध्ये भरती करण्याची जबाबदारी घेतलेल्या एका जणाला पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. एनआयएने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे संपूर्ण देशांमध्ये खळबळ माजली आहे.

काही दिवसांपूर्वीच डीआरडीओ चे वैज्ञानिक प्रदीप कुलूरकर यांना पाकिस्तानला भारतातील महत्त्वपूर्ण माहिती पुरवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. यानंतर आता विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातून एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचा इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हन्ट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया खोरसान यांसारख्या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या इसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा देखील स्पष्ट झाल आहे.

इसिस संघटनेच्या रिक्रुटमेंट ची जबाबदारी असलेल्या या आरोपी डॉक्टरचे नाव आहे अदनाली सरकार. पुण्याच्या कोंढवा परिसरातून त्याला काल अटक करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून अदनाली सरकार हा पुण्यामध्ये राहतो आणि त्याच्या दहशतवादी संघटनेतील भरतीची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली होती. इसिस मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवणं ही त्याची मुख्य जबाबदारी असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्र हे मॉडेल पोहोचवण्यात डॉक्टर अदनाली याचा मोठा हात होता. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एका जणाला देखील अटक केली आहे.

महत्वाची कागदपत्रे जप्त

डॉक्टर अदनाली सरकार याच्या घरामधून इसिस संदर्भातील अनेक कागदपत्र मिळून आली आहेत. तसेच काही इलेक्ट्रॉनिक डिवाइस देखील एनआयएच्या हाती लागले असून तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग करण्याचा हा सगळा प्रकार डॉक्टर अदनाली सरकार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोण आहे अदलानी सरकार

अटक करण्यात आलेले डॉक्टर अदनान अली सरकार यांना भूल उपचाराचा १६ वर्षांचा अनुभव आहे. डॉ. अदनान अली यांनी बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून 2001 मध्ये एमबीबीएस पदवी पूर्ण केली. त्यानंतर 2006 मध्ये याच कॉलेजमधून अदनानने एमडी अॅनेस्थेशिया केले. दहशतवादी संघटना ISIS चा समर्थक असलेल्या डॉ.अदनानला इंग्रजी, हिंदी, मराठी आणि जर्मन भाषा येत आहेत. तसेच, वैद्यकीय अभ्यासक्रमांची अशी अनेक पुस्तके आहेत, ज्यामध्ये अदनान अली सरकार यांनी सहाय्यक प्रकाशक म्हणून काम केले आहे. आत्तापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, डॉ. अदनान हा दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवाया भारतात पसरवण्याचा कट रचून भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या इराद्याने तरुणांची इसिस संघटनेत भरती करण्याच्या प्रयत्नात होता. एनआयएने प्रथमदर्शनी अदनानच्या कृतीला देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. NIA ने 28 जून 2023 रोजी डॉ. अदनान आणि त्याच्या टोळीशी संबंधित इतर संशयितांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

यांना करण्यात आली अटक

डॉ. अदनान अलीच्या आधी, 3 जुलै 2023 रोजी NIA ने इतर 4 संशयितांना मुंबईतून अटक केली. डॉ. अदनानच्या आधी अटक करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे मुंबईतील तबिश नसीर सिद्दीकी, जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ ​​अबू नुसिबा, पुणे, शरजील शेख, ठाणे आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी आहेत. या सर्वांच्या चौकशीच्या आधारे आता त्यांच्या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करणार असल्याचेही एनआयएचे म्हणणे आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here