Skip to content

Board exam update : दहावीच्या परिक्षांबाबत झाला हा मोठा निर्णय


Board exam update : राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुढेही काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दहावी बोर्डाचा आजच पेपर रद्द करण्यात आला आहे. बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात बोर्डाकडून(board) एक प्रसिद्धीपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण(ssc,hsc) मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा घेतल्या जात आहेत. दिनांक 18 जुलै ते 1 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये दहावीची पुरवणी परीक्षा तर 18 जुलै ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत बारावीची पुरवणी परीक्षा होत आहेत. या पुरवणी परीक्षासंबधिचं वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

https://thepointnow.in/national-crime/

मात्र राज्यातील काही जिल्ह्यांना आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं बोर्डाकडून आजचा दहावीचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा पेपर सुधारीत वेळापत्रकानुसार गुरुवार तीन ऑगस्ट रोजी सकाळी आकरा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान होणार आहे.

आज दहावीचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर होता, मात्र अतिवृष्टीच्या इशारामुळे आता हा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत बोर्डाकडून एक प्रसिद्धी पत्रक देखील जारी करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळणार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर दहावीचा शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलला आहे. आता हा पेपर आता 3 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. दरम्यान, दहावीबरोबर बारावीचा पेपर देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2023 मधील दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे.

यात दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट, तर बारावीची 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होत आहे. परंतु सध्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटीदेखील जाहीर केली आहे.

कोरोना काळापासून फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातील शैक्षणिक सत्रांच गणित बिघडल आहे. याआधी मार्च ते मे महिना दरम्यान दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होत असायच्या मात्र कोरोना काळापासून शैक्षणिक सत्र बदलले आहे. आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा या जून महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. असं असतानाच आता राज्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्यामुळे दहावीच्या परीक्षांचे काही पेपर ढकलण्यात आले आहेत


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!