Crime update : चंद्रपूर मध्ये अज्ञाताने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात भाजप पदाधिकाऱ्यांच्या पत्नीचा मृत्यू

0
36

Crime update : चंद्रपुरातील राजुरा शहर हादरले असून येथे पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. ज्यामुळे लोकांच्या मनात भीती पसरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली. चंद्रपुरातील राजुरा शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पुन्हा एकदा गोळीबार केला.

या गोळीबारात भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या पत्नीला दोन गोळ्या लागल्या. यातील एक गोळी थेट छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पूर्वशा सचिन डोहे (वय 27) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. पूर्वशा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन यांची पत्नी आहे. या गोळीबारात लल्ली नामक आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://thepointnow.in/landslide-in-mumbai-pune-express-way/

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सोमनाथपुर वार्डात रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी सचिन डोहे यांच्या घरासमोरून एका व्यक्तीवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज आल्याने पूर्वशा घराबाहेर आल्या. यात पूर्वशा यांना दोन गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमी लल्ली यास चंद्रपूरला हलविण्यात आले असून नेमका गोळीबार कोणत्या कारणासाठी झाला यावर प्रश्नचिन्ह आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here