जलज शर्मा यांनी स्वीकारला नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

0
36

नाशिक: नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले जलज शर्मा यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या मुख्य दालनात पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पार पडली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितिन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे, तहसिलदार परमेश्वर कासोळे, नरेश बहिरम, नायब तहसिलदार विजय कच्छवे, विधी अधिकारी हेमंत नागरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करून संवाद साधला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here