Political breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर दीड वर्षानंतर जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील भोसरीमध्ये भूखंड घोटाळाप्रकरणी ते तुरुंगात आहेत. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनासयाच्या (ईडी) कारवाईवर ताशेरे ओढले आहेत.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ७ जुलै २०२१ रोजी चौधरी यांना अटक केली होती. २०१६ मध्ये खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर भोसरी भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून कवडीमोल भावात आपल्या नातेवाइकांच्या नावाने जमीन खरेदी केल्याची तक्रार पुणे येथील हेमंत गावंडे यांनी २०१६ मध्ये बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती.
या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी आणि मूळ भूखंड मालक अब्बास उक्कानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर खडसे यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. खडसे यांचे भोसरी भूखंड प्रकरणात महसूल मंत्री पद गेले होते. तसेच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील चौकशी झाली होती. खडसे यांचे जावई गिरीष चौधरी हे तर दोन वर्षापासून जेलमध्ये होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम