Nashik : सुरगाणा तालुक्यातील अवैध वृक्षतोड सुरूच ; लाखोंचे खैर लाकूड जप्त

0
40

Wood Thift : नाशिक तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागातील पिंपळसोंड जंगलात खैर लाकडाची तस्करी जोरात सुरु असून वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रविवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास पिंपळसोंड जंगलातील दगडपाडा या गुजरात सीमावर्ती जंगलात खैर लाकडाची एक पिक अप गाडीत खैराची लाकडे भरलेली असून ते चिंचमाळ, बर्डा, वांगण, करंजुल, मांधा या मार्गे जाणार असल्याचे समजल्यावर वनविभागाच्या कर्मचारी यांनी सापळा रचून गाडी ताब्यात घेतली आहे.

 

मात्र अंधाराचा फायदा घेत तस्कर तसेच चालक चावी गाडीतच सोडून पसार झाले. या वाहनावर कोणत्याही प्रकारचे नंबर आढळून आले नाहीत.

 

या पिंपळसोंड,तातापानी, चिंचमाळ, कुंभारचोंड, धुकट्या डोंगर या परिसरातून वर्षभरात बारापेक्षा जास्त चारचाकी वाहने खैर, सागवान लाकुड मालासह पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. यामध्ये खैर लाकडाचे सहा ते सात नग असून एक घनमीटर लाकुड जप्त केले आहे. त्याची किंमत बावीस हजार आठशे तीस रुपये आहे. तर गाडीची किंमत अंदाजे एक ते सव्वा लाख रुपये आहे.

 

उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली असून सर्वच वाहने वणी येथील वनविभागात जमा करण्यात आली आहेत. या कामी वनरक्षक हिरामण थविल, आनंदा चौधरी, उमाजी पवार, वामन पवार, वन परिमंडळ अधिकारी द्रौपदा चौधरी, अविनाश छगने वन मजूर हरिचंद्र चौधरी, उखाराम चौधरी, छगन बागुल, रावजी चौधरी आदींनी यशस्वी कामगिरी केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here