Nashik Monsoon Update : गेल्या आठवड्याभरापासून नाशिकसह जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.
Job alert : राज्यात ५० हजार शिक्षक भरती, दोन टप्प्यांत पूर्ण होणार प्रक्रिया
गेल्या आठवड्याभरापासून नाशिकसह जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस पडत असला तरी नागरिकांसह शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र आजही जोरदार पावसाने नाशिकला हुलकावणी दिली आहे. त्यामुळे अर्धा जुलै संपत आला तरीही अद्याप दमदार पावसाने हजेरी नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर अल्पावधीतच पावसाने उघडीप दिली त्यानंतर शेती कामांना वेग आला होता. मात्र आता भात लागवड करण्याची वेळ आली असताना पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे अर्धा जुलै संपत आला तरी अद्यापही भात लावणी सुरू झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. आज तरी नाशिकसह जिल्ह्यात पाऊस पडेल, अशी आशा नाशिककरांना होती. मात्र आजही रिमझिम पावसाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये तब्बल ९१ लाखांची लूट काय आहे संपूर्ण प्रकरण?
सिन्नर, येवला, नांदगाव” मालेगाव, चांदवड, नाशिक व निफाड या भागांमध्ये खरीप पिकांची पेरणी सलग तीन ते चार दिवस पेरणीयोग्य 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यावर करावी असे कृषी विभागाने सुचवले आहे. मका, सूर्यफूल, बाजरी, भुईमूग, खुरासणी या पिकांच्या पेरणीस उशीर केल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होईल. दरम्यान जिल्ह्यातील इतरही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून यामुळे भात लागवड कोळंबलेली आहे तर अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ही उभा राहिला आहे.
दरम्यान पावसाचा अंदाज लक्षात घेता भात रोपवाटिका नवीन लावलेली फळबाग व भाजीपाला पिकातून अधिकचे पाणी काढावे. तसेच पूर्वेकडील अवर्षण प्रवण व मैदानी विभागात पडणाऱ्या पावसाचे पाणी शेतात साठवण्यासाठी उपाययोजना करावी कापूस तूर भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, सूर्यफूल या वेळेवर लागवड केलेल्या पिकात पावसाने उघडिप दिल्यास अंतर मशागत व तंत्र तणनियंत्रणाची कामे करावीत. पावसाचा अंदाज घेऊन पिकावर कीटकनाशकांची बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्याचबरोबर भात रोपवाटिकेत रोपांच्या वाढीसाठी नत्रखत द्यावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम