Shasan aaplya dari : नाशकात आज नऊ मंत्र्यांची उपस्थिती ; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

0
39

Shasan aaplya dari :
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सूरु असलेल राजकीय नाट्य संपून अखेर शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. आणि या नाट्यक्रमाला पूर्णविराम लागला. खातेवाटप झाल्यानंतर आज पहिला शासन आपल्या दारी कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. बरोबरच मंत्रिमंडळातील तब्बल नऊ मंत्र्याची उपस्थिती या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार असल्याने या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात आज मंत्र्याची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संपूर्ण शहरात ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नाशिकच्या गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीगृह मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होत असून. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह नऊ मंत्री उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमासाठी उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहेत. तीन पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे.

 

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांनी आपल्या लाडक्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here