Dharashiv News: धाराशिवमधुन एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका चिमुकल्याचा मृतदेह आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळल्याच समोर आलंय. हे प्रकरण समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर पालकांनी घातापाताचा संशय व्यक्त केला आहे.
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील एकलव्य आश्रम शाळेत इयत्ता पहिली वर्गात शिकत असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये संस्कार राठोड या सात वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृत्यू संशयास्पद रित्या झाला असून आई-वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. या संदर्भात तुळजापूर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
Bus accident : पुन्हा बसचा अपघात ; इतके प्रवासी जखमी
दरम्यान, यमगरवाडी एकलव्य आश्रम शाळेतील सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या आईने तर हंबरडाच फोडला. आता या प्रकरणी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या प्रकरणाचा तपास सुरु असून तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं तुळजापूर पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकाराबाबत अद्याप पोलीस प्रशासनाने माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम