Letter to president : एका वैतागलेल्या मतदाराने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून केली ही मागणी

0
21

Letter for president : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण देशभरातील चर्चेचा विषय ठरण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणत्याही दोन पक्षांमध्ये युती होऊन सरकार स्थापन होत आहे. यामुळे सर्वसामान्यांनी केलेल्या मताला किंमत आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच या सर्व घडामोडींनी त्रस्त झालेल्या नाशिकच्या एका सर्वसामान्य नागरिकाने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून पक्षांतर बंदी कायदा कठोर करण्याची विनंती केली आहे. तसेच मतदारांच्या मताला काही किंमत आहे का? असा सवाल करत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, महागाई, मतदारसंघातील अडचणींबाबत कोणत्याही आमदारांनी पक्ष सोडल्याचं दिसत नसल्याचा स्पष्ट उल्लेखही त्याने या पत्रामध्ये केला आहे.

 

दरम्यान थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहून पक्षांतर बंदी कायदा कठोर करण्याची विनंती नाशिकच्या हर्षल कुमार गांगुर्डे यांनी केल्याने त्यांच्या या पत्राची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 

मतदार निवडणुकीच्या वेळी मतदान करताना ज्या पक्षाला नेत्याला बघून मतदान करतो त्या पक्षाचा विचारांना मतांना निवडणूक जाहीरनाम्याला ते मत दिलेले असते. मात्र आजकाल त्याला तिलांजली देऊन स्वार्थ साधण्यासाठी काही लोक पक्ष सोडत असल्याचं दिसत आहे. 1985 मध्ये 52 व्या घटना दुरुस्ती विधेयकानुसार पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला आहे. याद्वारे घटनेत दहाव्या परिशिष्टांचा समावेश करून कलम 102 आणि 1921 नुसार या आमदारांना खासदारांना पात्र ठरवणारा अनुच्छेदांमध्ये बदल करण्यात आला. मात्र सध्याच्या स्थितीला अनुसरून तो कायदा आता पुनश्च विचाराधीन घेऊन त्यात या आयाराम गयाराम संस्कृतीला लगाम घालण्यासाठी आणखी कडक कायदा करावा’, अशी विनंती या पत्राद्वारे हर्षल गांगुर्डे यांनी केली आहे.

 

लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आजकाल सुरू असून लोकशाही भारतीय संविधान जिवंत ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन या कायद्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले आहे. मतदार राजांनी दिलेला कौल हा त्या आमदार-खासदाराला पाच वर्षांसाठी त्या पक्षासाठी असतो. तरी त्याला निवडून आल्यानंतर पुढील निवडणुकीपर्यंत पक्ष बदल करता येऊ नये, अशी तजवीज करावी, जर कुठल्या आमदार खासदारास पक्ष बदलायचा असेल तर त्याने राजीनामा देऊन जनतेच्या दरबारात पुनश्च जाऊन नवीन पक्षातर्फे निवडणूक लढवावी, अशी तरतुद करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येत आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here