दिल्लीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील गीता कॉलनी उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला असून या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या महिलेची ओळख पटली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,
दिल्लीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे काही अवशेष मिळून आले आहेत. दिल्लीतील उड्डाण पुलाजवळ मानवी शरीराचे काही अवयव पडून असल्याची माहिती सकाळच्या सुमारास पोलिसांना मिळाली महिलेचा वय 35 ते 40 वर्षे असल्याचं सांगण्यात येत असून या महिलेची ओळख अजूनही पटली नाही. या मृतदेहाचे अनेक तुकडे मिळून आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फॉरेन्सिक टीम देखील पाचारण करण्यात आली आहे. घटना घडलेला संपूर्ण परिसर नाकाबंदी करण्यात आला असून पोलिसांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
सेंट्रल रेंजचे जॉईंट सीपी परमादित्य यांनी याबाबत माहिती देत असताना सांगितले आहे की, दोन काळ्या पॉलिथिनच्या पिशव्या संशयास्पद आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका पॉलिथिन मध्ये कापलेले डोके आणि दुसऱ्या मध्ये शरीराचे इतर भाग आढळून आले लांब केसांच्या आधारे हा मृतदेह स्त्रीचा असल्याचं गृहीत धरण्यात आल आहे. मात्र त्याची अद्यापही ओळख पटलेली नसून तपास सुरू आहे.
Fragments of human body found again in Delhi : काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरवून सोडला होता. श्रद्धा वालकर हिचा प्रियकर आफताब याने तिची हत्या केल्याचं समोर आलं होतं. तिची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मेहरौलीच्या जंगला सह दिल्ली एनसीआर च्या अनेक भागात फेकले होते. श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी नोंदवल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर श्रद्धा हत्याकांड प्रकरण उघड किस आले. यानंतर पोलिसांनी आफताब याला अटक केली आहे. मात्र ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अशाच प्रकारे मृतदेहाचे अवशेष आढळून आल्याने दिल्ली मध्ये खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम