Deadthread : भुजबळ, मुंढेंपाठोपाठ आता रवी राणा यांना जीवे ठार करण्याची धमकी..

0
41

Deadthread : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना देखील जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अर्जुन लोखंडे नावाच्या व्यक्तींनं रवी राणांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. तू महाराष्ट्र फिरणं बंद कर. तू आमच्या विरोधात कसं काय बोलतो? आता जर तू थांबला नाहीस तर तुला संपवून टाकू. अचानक काही झालं किंवा अपघात झाला तर परत बोलू नको, असं दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गटाच्या छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना देखील जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. धनंजय मुंडे यांना परळी येथील निवासस्थानी हा फोन कॉल आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तींनं त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. या फोननंतर पोलिसांनी तपास सुरू केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here