Mehboob Pansare : जेजुरीचे प्रसिद्ध उद्योजक आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी त्यांच्या मारेकऱ्यांना आज अटक केली.
Nashik Crime : चोरांनी Atm मशीनच पळवले नाशिकच्या कायदा सुव्यवस्था प्रश्न पुन्हा ऐरणीवर
घटनेची गंभीरता व संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे पुणे शहर यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार सह पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांना आरोपी हे डेक्कन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.
खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मेहबूब पानसरे हे जेजुरी नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व उद्योजक होते. मेहबूब पानसरे यांची जमिनीच्या वादातून शुक्रवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे जेजुरीमध्ये खळबळ माजली होती. दरम्यान पानसरे यांच्या मारेकऱ्यांना आज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली.
वनीस प्रल्हाद परदेशी(रा. ४०४, गुरुवार पेठ, पुणे, मुळगाव रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी पुणे), महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी (वय ६५, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी पुणे, मुळगाव मु. पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्याच्या डेक्कन परिसरातून पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे निकटवर्तीय असलेले जेजुरीचे माजी नगरसेवक महेबूब पानसरे यांच्या हत्येमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. जमिनीच्या वादातून खून करून पसार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलिसांकडून सुरु होता. या आरोपींना डेक्कन परिसरातून पुणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या नेत्तृत्वाखाली खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
Monsoon Update: इगतपुरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी तालुक्यातील धरणाच्या पाणसाठ्यात वाढ
खंडणी विरोधी पथक- २, गुन्हेशाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीतांचा डेक्कन परिसरातुन शोध घेवुन त्यांना पकडून, नमूद आरोपींकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा निष्पन्न झाले. आरोपींची त्यांचे इतर साथीदारासह वरील नमूद गुन्हा केला असल्याचे कबुली दिली अटक केली आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम