Sharad pawar : मै टायर्ड नही, फायर हूं। शरद पवारांनी टोचले अजित पवार गटाचे कान….

0
46

Sharad pawar : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी केलेल्या टिकांना उत्तर दिलं आहे.

 

‘ज्या पद्धतीने अजित पवारांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच्यावर आज आमच्या एका सहकार्याने अटलबिहारी वाजपेयींची एक ओळ ऐकवली, ‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’ असं म्हणत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी अजित पवार यांचे कान टोचले.

 

मला माझ्या वयाबद्दल सल्ला दिला जात आहे. पण आताच्या मंत्र्यांमध्ये तटकरे आहे, भुजबळ आहे, अनेकांचं वय हे 70 च्या पुढे आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, त्यांच्याशी माझा संवाद यायचा, ते अधिक जोमाने काम करायचे ते मोरारजी देसाई होते, ते पंतप्रधान झाले त्यांचं वय 84 होतं, आणि ते दिवसाला किती तास काम करायचे, हे एकदा तपासून पाहा.

 

वय झालं असं नाही, पण चांगली प्रकृती असेल तर वय कधीच अडचण ठरत नाही. ज्या पद्धतीने अजित पवारांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच्यावर आज आमच्या एका सहकार्याने अटलबिहारी वाजपेयींची एक ओळ ऐकवली, ‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’ असं म्हणत पवारांनी अजितदादांना सुनावलं.

 

‘माझ्या वाचण्यात वेगळं आलं आहे, सुप्रिया सुळेंनी आपल्या कामाची सुरुवात भटक्या विमुक्त जातींसाठी केली. नंतरच्या काळात पक्षात त्या सक्रीय झाल्या. त्यावेळी लोकसभेत जाण्याची चर्चा झाली. बारामतीत निवडणूक लढवून त्या मोठ्या मतांनी विजयी झाल्यात. आजपर्यंत त्या अनेक वेळा निवडून आल्या आहेत त्यांची तिसरी टर्म आहे. या सगळ्या चर्चेत सत्तेत कोणतं स्थान मिळालं का याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत आलं तेव्हा सुर्यकांता पाटील यांना मंत्रिमंडळात घेतलं, सुप्रिया जेव्हा संसदेत होत्या, त्यांच्या कन्याला मंत्रिपद दिलं. तिथे सुप्रिया सुळे होत्या. 10 वर्ष पटेल यांना मंत्रिपद दिलं. प्रफुल्ल पटेल हे निवडणुकीत पराभूत झाले होते. तरी त्यांना राज्यसभेत घेतलं. त्यांना उड्डाण मंत्रिपद दिलं.

 

त्यामुळे त्यांनी हा प्रश्न उपस्थितीत केला असेल तर सुप्रिया सुळे 3 टर्म खासदार असताना सुद्धा त्यांना सत्तेत घेण्याची कोणतीच अडचण नव्हती. पक्षातून पटेल यांच्या बाजूने निर्णय दिला, सुर्यकांता पाटील यांना दिला. अनेक लोक म्हणायचे सुप्रिया सुळे यांच्यावर अन्याय केला, पण मी अनेक वेळा वस्तूस्थिती मांडली’ असं म्हणत शरद पवारांनी पटेल यांना टोला लगावला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here