Crime : आणि त्याने थेट प्रेयसीलाच पाजले विष….

0
47

Crime News : प्रेयसीच्या आईने दोघांच्या लग्नासाठी नकार दिल्याने युवकान आपल्या प्रियसीलाच विष पाजून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये घडला आहे.Crime News

 

एकीकडे जळगाव मध्ये ऑनलाईन ओळखीतून झालेल्या विवाह मध्ये नवविवाहिता तृतीयपंथी निघाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजवलेली असतानाच, दुसरीकडे प्रेयसीच्या आईने लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने आपल्या प्रेयसीला विष पाजून जीवे ठार केले तर स्वतः देखील आत्महत्या sucide करण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये असलेल्या भोपाळवाडी भागामध्ये घडला आहे.Crime News

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भोपाळवाडी गावातील 23 वर्षीय सुप्रिया जाधव हिचे तिच्याच गावात राहणाऱ्या 25 वर्षीय रोहिदास जाधव या तरुणासोबत प्रेम संबंध होते. Affair काही दिवसांपूर्वी या दोघांनाही सुप्रिया च्या आईने एका रात्री एकत्र पाहिले होते. मात्र रोहिदास आणि सुप्रिया दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करण्याची इच्छा असल्याने रोहिदास ने सुप्रियाच्या आईकडे लग्नाची मागणी घातली. मात्र यावेळी सुप्रिया च्या आईने या लग्नाला विरोध दर्शवला. याच रागातून रोहिदास जाधव यांनी स्प्राईट मधून सुप्रियाला विष पाजले आणि स्वतः देखील यानंतर विष प्राशन केले. Crime News मात्र दुर्दैवाने यामध्ये सुप्रियाचा मृत्यू झाला आहे. तर रोहिदास वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उस्मान नगर पोलिसांमध्ये रोहिदास जाधव या तरुणा विरोधात खुनाचा Crime News गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र लग्नास नकार दिल्याने प्रियकराने आपल्याच प्रेयसीची हत्या केल्याच्या या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here