Nashik : नाशिकरोड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा ; काय लागलं हाती?

0
44

Nashik : अन्न व सुरक्षा विभागाने नाशिकरोड येथे खुले तेल विकणाऱ्या कंपनीवर छापा टाकून सुमारे 71 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व सुरक्षा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे विक्रीवर प्रतिबंध आणि नियमन 2011 चे 2.3.15 (2) नुसार खाद्यतेल सुट्या स्वरूपात विकण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. त्यानुसार मे. तुलसी ट्रेडिंग कंपनी, शॉप नं. 6, जय भगवती शॉपिंग सेंटर, देवळाली गाव, सुभाष रोड, नाशिकरोड या ऑईल रिपॅकर या आस्थापनेची तपासणी केली असता FDAतेथे खुल्या स्वरूपात विनालेबलच्या बॅरलमध्ये खाद्यतेल विक्री सुरू असल्यावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित सुमारे 718.4 किलो 71 हजार 840 रुपये किंमतीचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला. या प्रकरणी घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार घेण्यात येईल. ही कार्यवाही FDA  अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप व सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.

ऑईल रिपॅकर्स विक्रेत्यांनी खुल्या स्वरूपात खाद्यतेलांची विक्री करू नये. त्याचप्रमाणे खाद्यतेल रिपॅक करण्यासाठी जुने व वापरलेले डबे वापरू नयेत.खुल्या स्वरुपात खाद्यतेल विक्री करणाऱ्या व जुन्या वापरलेल्या डब्यांचा पुनर्वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध संपूर्ण नाशिक विभागात तपासणी मोहीम राबविण्यात येणार FDA असून असे प्रकारे आढळून आल्यास संबधितांविरुदध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व व्यावसायिकांनी कायदयांतर्गत तरतूदींचे पालन करूनच व्यवसाय करण्याचे आवाहन सहआयुक्त (अन्न) संजय नारगुडे, यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here