Kopargaon : कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई-नागपूर महामार्गालागत असलेल्या गुरुराज पेट्रोल पंपावर गुरुवार दि.29 जुन रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपा वरील मॅनेजरवर दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात इसमानी धारदार चाकूने हल्ला केला असून यात पेट्रोल पंपावरील मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव (वय 40) रा. दहेगाव यांचा मृत्यू झाला आहे.
पेट्रोल पंपावर वाद होण्यापूर्वी शेजारी असलेल्या हॉटेलवरही या तिन्ही आरोपींचा व एका इसमांचा वाद झाला असून त्यात एक जण गंभीर जखमी झाला असल्याचे समजते. सदर घटनेनंतर आरोपी फरार झाले असून सदरची माहिती मिळात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सदर घटना सी सी टि व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सी सी टी व्ही द्वारे आरोपींचा शोध घेत आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अमोल मोहिते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात तीन फरार इसमांवर भादवी कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मुंबई-नागपूर महामार्गालागत असलेल्या गुरुराज पेट्रोल पंपावर पल्सर मोटार सायकल MH 17 CW 9104 यावरून आलेल्या तीन जणांनी पेट्रोल पंपावरील इसम अमोल धोंडीराम मोहिते हल्ली राहणार संवत्सर शिवार कोपरगाव यास धक्काबुक्की करून मारहाण करत कानाखाली मारली असता पेट्रोल पंपावरील मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव यांनी तू आमच्या माणसाला मारहाण का केली अशी विचाराणा केल्याचा राग येऊन तीन आरोपींनी मॅनेजर भोजराज घनघाव यांच्यावर धारदार चाकूने पोटावर, खांद्यावर वार करत गंभीर जखमी करत त्यास जीवे ठार मारले आहे. घटना घडल्यावर तीनही आरोपी आपल्या मोटर सायकल वरून फरार झाले आहे. पोलीस सी सी टी व्ही च्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.
पेट्रोल टाकण्याच्या वाद झल्याचे सी सी टी व्ही फुटेज मध्ये प्रथम दर्शनी दिसून येत असले तरी याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम