Dhule :
महिलेला अश्लील मेसेज करणाऱ्या रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या असिस्टंट ब्रांच मॅनेजरला उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला असून त्याला इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातून बाहेर काढत चोप देत आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नितीन सोमनाथ पाटील वय 34 रा. हजारे कॉलनी धुळे असे चोप दिलेल्या मॅनेजरचे नाव असून त्याच्या विरोधात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आझाद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुझे प्यार हो गया असा अश्लील मेसेज त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलवर मॅनेजर ने टाकला होता. याबाबत त्याला समज देऊनही त्याने अश्लील मेसेज पाठवने बंद न केल्याने पीडित महिलेने ऊबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत घडलेली घटना कथन केल्याने संतप्त झालेल्या उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गल्ली नंबर सहा येथील रिलायन्स लाइफ इन्शुरन्स येथील कंपनीत जाऊन असिस्टंट ब्रांच मॅनेजरला चोप दिला आहे. कंपनीच्या कार्यालयापासून ते आझाद नगर पोलीस स्टेशन पर्यंत असिस्टंट मॅनेजरला चोप देत आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एकीकडे महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना यामुळे राज्यातील महिलांमध्ये भीतीच वातावरण पसरलेला आहे त्यातच मागील आठवड्यात पुण्यामध्ये झालेल्या दर्शना पवार हत्याकांड व दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भरवस्तीत म्हणजेच सदाशिव पेठ मध्ये झालेल्या तरुणीवरील कोयत्याच्या हल्ल्यामुळे राज्यात राजकारण तापलेला असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिलांनी कंपनीत काम करणाऱ्या महिलांना अश्लील मेसेज करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या असिस्टंट ब्रांच मॅनेजरला चोपते त्याला फरफटत पोलिसांच्या हवाली केल्याने त्यांच्या या कारवाईचं स्वागत केलं जात आहे तर महिलांना त्रास देणाऱ्या नराधमांना अशीच शिक्षा सुनावली जाईल असा सूचना वजा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण पाहता राज्य शासनाने यावर उपाययोजना कराव्या अशी मागणी आम्ही ठाकरे गटाच्या वतीने करत आहोत तसेच यापुढे देखील महिलांना टॉर्चर करणाऱ्या नराधमांना याच प्रकारे धडा शिकवला जाईल.
शुभांगी पाटील – पदाधिकारी – शिवसेना ठाकरे गट
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम