Nandgaon :- चोरी प्रकरणी तपासासाठी ताब्यात घेतलेल्या संशयिताने पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातून धुम ठोकल्याचा प्रकार नांदगाव पोलीस ठाण्यात घडला असून रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही संशयित न सापडल्याने पोलिसांसमोर त्याला शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. तपासासाठी ताब्यात घेतलेला संशयित हा सराईत असल्याची माहिती समोर आली आहे. संशयिताने पोलीस ठाण्यातुन धूम ठोकल्याने या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हिरामण गांगुर्डे (रा. दिंडोरी) असे या धूम ठोकलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
दिनांक 23 जून 2023 रोजी रात्री नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या धरणातील कृषी पंपासाठी वापरल्या जाणाऱ्या केबल चोरीच्या गुन्ह्यात दोन संशयित यांना पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर संशयितांनी दिलेल्या माहितीवरून नांदगाव पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील हिरामण गांगुर्डे या तिसऱ्या संशिताला ताब्यात घेत त्याला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यास दोन दिवसाची 27 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी संशयित हिरामण गांगुर्डे यास पुढील तपासासाठी नांदगाव पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांचे आपल्यावर लक्ष नसल्याचे समजताच हिरामण गांगुर्डे यांने सर्वांची नजर चुकवत दिनांक 28 जुन 2023 रोजी सोमवारी पोलिसांच्या हातावर तुरी देत नांदगाव पोलीस स्टेशनमधून धुम ठोकली. जरा वेळाने हिरामण गांगुर्डे हा पोलीस ठाण्यात नसल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना कळताच पोलीस ठाण्यातील सर्वांची भंबेरी उडाली.आणि तात्काळ त्याच्या शोधासाठी पोलीस सर्वत्र तपास करू लागले. परंतु रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन देशील हिरामण गांगुर्डे हा कोठेही मिळून आला नाही. दिनांक 26 जून 2023 रोजी सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरूच होते. नांदगाव पोलीस स्टेशन मधून पळून गेलेला हिरामण गांगुर्डे हा सराईत आहे. शोध घेऊन देखील हिरामण गांगुर्डे मिळत नसल्याने नांदगाव पोलीस दलासमोर त्याला शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. संशिताचा पोलिसांकडून तालुक्यात सर्वत्र कसून शोध घेतला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम