Pune : पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला करणारा तो तरुण पोलिसांच्या ताब्यात…

0
42

Pune : पुण्यामध्ये झालेल्या दर्शना पवार हत्याकांडाला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा एकदा पुणे शहराला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरल आहे.

पुणे शहरातील वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदाशिव पेठ या ठिकाणी ही घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत सदाशिव पेठ परिसरातून जात असताना मागून आलेल्या आरोपी तरुणाने अचानकपणे तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी या हल्ल्यात जखमी झालेल्या या तरुणीने आपला जीव मुठीत घेऊन पळ काढायचा प्रयत्न केला. दरम्यान होत असलेला हा प्रकार पाहून एका तरुणांने तिच्या मदतीसाठी धावून येत हल्लेखोराला रोखलं आहे. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पुढे येत्या हल्लेखोर तरुणाला चांगला चोप दिला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या हल्लेखोल तरुणाला ताब्यात घेतल आहे. मात्र त्याने हा हल्ला का केला हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी मात्र एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय तर या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून संतप्त प्रतिक्रिया नेटकर्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान पुन्हा एकदा दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती होत असल्याचं समोर आल्याने आता पोलिसांनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोरात कठोर उपाय योजना कराव्यात आणि या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here