नाशिक जिल्ह्यात अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये, शहरातील विविध भागात होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना शारीरिक त्रासाला समोर जावं लागत आहे. नाशिक शहरात पुन्हा एक अपघात घडला आहे. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला एका पिकअप वाहनाने धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून बाकी विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहचवण्यात आले असून आडगाव पोलीस घटनास्थळी हजर झाले असून त्यांनी तात्काळ परिस्थिती हाताळली आणि वाहतूक सुरळीत केली.
या अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल रविवारची सुट्टी झाल्यानंतर सोमवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी स्कूल व्हॅनमध्ये जवळपास 10 ते 12 विद्यार्थी जात होते. मात्र कोणाला काही कळायच्या आत तपोवन परिसरात पिकअप वाहनाने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली व व्हॅन पलटी झाली.
या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले असून बाकी विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. येथील उपस्थित नागरिकांनी वेळीच धाव घेऊन विद्यार्थ्यांना गाडीच्या बाहेर काढले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे विद्यार्थी पाचवी ते सहावी मध्ये शिकत असून ते बिडी कामगार या परिसरातील असल्याच समोर आलं आहे.
नाशिकमध्ये अपघातांची मालिका वाढली असून काही बेजबाबदार लोक महामार्गावर कशाही प्रकारे वाहन चालवणे तसेच कोणतेही नियम न पाळणे हे याला कारणीभूत आहे. त्यामुळे यांच्यावर वेळीच चाप बसवण्याची वेळ आली असून यामार्फत हे अपघात रोखता येऊ शकतात.
“आम्ही हळूपणे शाळेत जात होतो, मात्र एकीकडून अचानक पिकअप वाहन आले आणि धडक दिली, आणि आमची गाडी पलटी झाली. मला पायाला लागलं असून एका मुलाच्या हाताला लागलं आहे, त्याचा मोठा रक्तस्त्राव होत होता, आणखी एका मुलीला लागलं असल्याचं एका विद्यार्थ्याने सांगितल आहे.
अपघातग्रस्त विद्यार्थी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम