Nashik : काही महिन्यांपूर्वी नाशिक मधील सातपूरच्या कार्बन नाका भागामध्ये असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ पूर्व वैमनस्यातून काही जणांकडून तपन जाधव याच्यावर पाठलाग करत गोळीबारासह धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. या हल्ल्यामधील मुख्य संशयीतांसह सहा जणांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तरी यातील एका फरार असलेल्या संशयित आरोपी अक्षय उत्तम भारती याला पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत.
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये नेहमीच हाणामारी आणि पूर्व वैमानस्यातून हत्या यांसारख्या घटना समोर आल्या आहेत असेच एक घटना एकोणावीस मार्चला घडली होती या ठिकाणी तपनच्या चार चाकी कारचा सिनेस्टाइल पाठलाग करत आपली कार तपनच्या कारवर आदळली होती. यानंतर हवेत गोळीबार करून तपन जाधव वर कोयत्याने वार करत तपन व त्याचा जोडीदार राहूल पवार यांच्या पाच ते सहा गोळ्या झाडल्या होत्या व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान या हल्ल्यात थोडक्यात बचावलेल्या राहुल पवार याने सातपूर पोलीस ठाण्यामध्ये संशयितां विरोधात फिर्याद दाखल केली होती. तर घटनेच गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी लागलीच तपास सूत्र फिरवत या प्रकरणामध्ये भूषण किसन पवार, रोहित मंगलदास अहिरराव, गणेश राजेंद्र जाधव, किरण दत्तात्रय चव्हाण चौघे राहणार शिवाजीनगर सातपूर तसेच आशिष राजेंद्र वाघ व सोमनाथ झांझर उर्फ सनी यांना सातपूर या ठिकाणाहून ताब्यात घेतलं होतं. तर अक्षय भारती व चेतन इंगळे हे दोघं संशयित फरार होते. यातील मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचत पोलिसांनी शिंदे गावांमधून अक्षय भारती याला अटक केली आहे. संशयित आशिष जाधव व फिर्यादी राहुल पवार हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यात एकमेकांच्या भावाच्या खुनावरून दुश्मनी आहे. याच पूर्ववैमनस्यातून संशयित आशिष जाधव व त्याच्या साथीदारांनी कट रचत राहुल पवार व तपन जाधव यांच्यावर हा हल्ला केला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आल आहे. तर फरार असलेल्या चेतन इंगळे याचा शोध पोलीस घेत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम