Mumbai : त्या धाडसत्रात ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?

0
38

मुंबईमधील लाईफ लाईन कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस मुंबईमधील जवळपास 15 ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय तर्फे धाडी टाकण्यात आल्या होत्या, या धाडींमध्ये मोठं घबाड हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. काही लोकांची या प्रकरणात चौकशी सुरू असून या प्रकरणी आणखी कसून चौकशी केल्यास अनेक नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईडीने बुधवारी सकाळच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील केके ग्रँड येथील घरावर छापा टाकला आणि धाडसूत्र सुरू झालं. सांताक्रुज, मालाड, परळ, परळ, वांद्रे यांसह जवळपास पंधरा ठिकाणी एकाच वेळी कडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये तब्बल 68 लाख रुपये रोख रक्कम, पंधरा कोटी रुपयांच्या बँकेतील मुदत ठेवी, अडीच ते तीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 158 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे कोविड सेंटर घोटाळा.

मृतदेह ठेवण्याच्या बॉडी बॅग ची तिप्पट दराने खरेदी, बोगस डॉक्टर स्टाफ, 60 ते 65 टक्के स्टाफ नसताना त्यांच्या नावाने पेमेंट, औषधांची देखील तीस टक्के चढ्या दराने खरेदी लाईफ लाईन घोटाळ्यामध्ये करण्यात आली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कंपनीने खोटी माहिती देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या कंपनीला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुंबई महापालिकेने या कंपनीला कंत्राट दिलं कसं असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर छापा टाकण्यात आला आणि त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय जयस्वाल यांच्या पांढरे पूर्व येथील रुस्तमजी ओरियाना टॉवर मधील घरावर देखील यावेळी छापा टाकण्यात आला. तर लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस चे प्रवर्तक सुजित पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं घबाड ईडीच्या हाती लागल आहे. तर अनेक महत्त्वाचे दस्तऐवज देखील ईडीच्या हाती लागले असून यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानुसार ही कारवाई केली जात असून लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस फर्मचे भागीदार डॉक्टर हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here