गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये खून, दरोडे, हाणामारी, चोरी यांसारख्या घटनांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या शेवगाव या ठिकाणी समोर आली आहे. शेवगाव शहरामध्ये पहाटेच्या सुमारास काही दरोडेखोरांनी एका घरावर केलेल्या हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत असून यात एक महिला देखील गंभीर रित्या जखमी झाली आहे त्याच्यावर पाणी झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शेवगाव शहरामध्ये बलदवा कुटुंबावर काही दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये बलदवा कुटुंबातील दोघेजण ठार झाले असून एक महिला जखमी झाली आहे. दरोडेखोरांनी घरातील काही ऐवज देखील लुटून नेला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी जखमी महिलेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान हा हल्ला नेमका कशामुळे झाला हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी या हल्ल्याचा छडा लावण्यासाठी घटनास्थळावर फिंगरप्रिंट, डॉगस्कोड पथक पाचारण करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या या घटनांमुळे भीतीच वातावरण पसरलं असून नागरिकांनी देखील सतर्कता बाळगण्याच आवाहन करण्यात आलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम