Satara : दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपीला अखेर अटक….

0
23

Pune : लग्नास नकार दिला म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यामध्ये तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक देखील केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस आरोपी राहुल हांडोरे यांच्या शोधात होते दरम्यान आज राहुल याला मुंबईमधून अटक करण्यात आली आहे.

 

दर्शना हत्या प्रकरणात नेमकं काय घडलं?

दर्शना आणि राहुल हंडोरे हे नातेवाईक होते गेल्या अनेक वर्षापासून या दोघांमध्ये ओळख होती. दरम्यान राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती, राहूल आणि दर्शना हे दोघेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत होते. यापैकी दर्शना आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यावर्षी राज्यात तिसरी आली. तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण करत घवघवीत यश मिळवलं व आपल्या अधिकारी पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी ची औपचारिकता पूर्ण करून अवघ्या काही दिवसातच दर्शना नोकरीवर रुजू होणार होती. मात्र या दरम्यान दर्शनाच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं आणि तिच्या घरात लग्नाच्या हालचाली देखील सुरू झाल्या.

 

दर्शनाचे लग्न ठरल्याने राहुल हांडोरे हा अस्वस्थ होता दर्शनाने आणि तिच्या घरच्यांनी तिला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी थोडा वेळ द्यावा असा आग्रह त्याने दर्शनाकडे धरला तो मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुल आणखीनच अस्वस्थ झाला.

 

12 जूनला दर्शन आणि राहुल दोघेही राजगडावर फिरण्यासाठी गेले सकाळच्या सुमारास राजगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर दोघांनी गडचिडा चढायला सुरुवात केली. दरम्यान तीन दिवस उलटूनही दर्शना घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार 15 जूनला पोलिसात नोंदवली होती. यानंतर 18 जूनला तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला, मृतदेहाची ओळख पटवणे अवघड जात होतं यामुळे घातपाताची शक्यता पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती.

 

यावेळी तपास करत असताना राहूल आणि दर्शना दोघे गड चढत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. दरम्यान दर्शनाची हत्या झाली असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी आपली तपास सूत्र फिरवत प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली यावेळी दर्शना आणि राहुल हे राजगडाच्या दिशेने जाताना दिसले मात्र दहा वाजेच्या सुमारास राहुल हांडोरे हा एकटाच परतत असतानाच समोर आलं. यामुळे पोलिसांचा संशय बळकावला आणि त्यांनी राहुलचा शोध सुरू केला त्याच्या शोधासाठी पाच पथक तयार करण्यात आली होती. जवळपास दहा दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर मुंबईमधून राहुलला पकडण्यात पोलिसांना यश आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र लग्नास नकार दिल्याने दर्शनाची हत्या करण्यात अल्याचा प्रकार उघड झाल्याने राहुलला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here