Yoga day – जागतिक योगा दिनासाठी नाशिकमधील विद्यार्थी सज्ज

0
35

Nashik – 21 जून हा दिवस जागतिक योगा दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी योगासने सर्वोत्तम पर्याय म्हणून ओळखलं जातात. याच योगा दिना निमित्त नाशिक शहरासह जिल्हाभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे द्यायला सुरुवात झाली आहे.

 

या दिवशी योगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरात कार्यक्रम आयोजित केले जातात. लोकांना योगाचे फायदे सांगितले आहेत. योग ही अनेक शतकांपासून भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. ऋषीमुनी प्राचीन काळापासून योग करत आले आहेत. भारताच्या पुढाकाराने योगाभ्यास महत्त्व पाहून आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वीकारल गेला आहे.

 

जागतिक योग दिनाचे आणि आयुर्वेदातल्या योगक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना बालकांना कळावे आणि त्यांनी आरोग्य संपन्न व्हावे यासाठी योग दिनाच्या निमित्ताने नाशिक येथील शाळांमधून विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे शिकविले जात आहेत. नाशिक येथे प्राथमिक व माध्यमिक विद्यालये तसेच इतर अनेक शाळांमध्ये योग विद्या धाम मधून प्रशिक्षित झालेल्या महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या शिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण दिले जात असून महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या रचना विद्यालयात योग शिक्षिका नेहा संजय शेंडे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देत आहेत. शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी या योग प्रशिक्षणात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असून २१ जून रोजी होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या शहरातील सर्वात मोठ्या कार्यक्रमात हे विद्यार्थी सहभागी होऊन योगाभ्यास सादर करणार आहेत. जिल्ह्यातील 15 पेक्षा अधिक संस्था आणि हजारो साधक या योग अभ्यासात सहभागी होणार आहे.

 

तर राज्यातही विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे. त्यामुळे योगा हा केवळ एक दिवसासाठी मर्यादित न राहता दररोजच योगाभ्यास केला गेला पाहिजे आणि आपली परंपरा असलेल्या योगासनांचा वारसा पुढील पिढ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे असं प्रशिक्षकांच्या वतीने व्यक्त करण्यात आल आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here