Igatpuri : तलावात उतरून मद्यपान करणाऱ्या ते दोघे अखेर ताब्यात

0
33

Igatpuri : इगतपुरी तालुक्यामध्ये रेल्वे विभागासाठी स्वतंत्र तलाव उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र याच तलावामध्ये दोघा मद्यपिंकडून धिंगाणा घालण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या तलावाच्या मध्यभागी जाऊन या दोघांना जणांनी मध्यपान करत धिंगाणा घातला होता यामुळे रेल्वे सुरक्षा दलाकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

पावसाळा म्हटलं की नाशिक जिल्हा जणू हिरवाईने नटून निघतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डोंगरदऱ्या असल्याने नाशिकचं वातावरण हे अगदी पृथ्वीवरील स्वर्ग असल्यासारखे भासत असत यामुळे मुंबई, पुणे, ठाणे यांसह राज्यातून तसेच देशभरातून हौशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये दाखल होत असतात. तसेच नाशिकला धार्मिक महत्त्व देखील असल्याने या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची रेलचेल बघायला मिळते. मात्र काही पर्यटकांकडून गैर कृत्य केले जात असल्याच्या अनेक घटना या आधी देखील समोर आले आहे अशीच एक घटना इगतपुरी तालुक्यात असलेल्या रेल्वे सुरक्षा विभागाच्या हद्दीत येणाऱ्या तलाव परिसरात घडली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास इगतपुरी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या दोघाजणांनी यावेळी तलावाच्या मध्यभागी जाऊन मद्यपान करायला सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांकडून याबाबत रेल्वे सुरक्षा दलाला माहिती देण्यात आली. याची गांभीर्याने दखल घेत रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोघां मद्यपिंना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ठिकठिकाणी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जाते. यावेळी अनेक तरुणांकडून मदयप्राशन करत पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या नागरिकांना त्रास दिला जातो तर नशेच्या धुंदीत अनेक जणांकडून करण्यात येत असलेल्या हुल्लडबाजी मध्ये कित्येक जणांनी आजवर जीव गमावला आहे. यामुळे फक्त इगतपुरी परिसरातच नव्हे तर ठीक ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी मदयप्राशन करू नये, हुल्लडबाजी करू नये व पर्यटन स्थळांची नासधूस होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी अस आवाहन यावेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात आले आहे.  तसेच रेल्वे विभागाच्या अख्यातरीता येणाऱ्या परिसरात कोणतेही गैरकृत्य करताना पर्यटक अथवा स्थानिक आढळून आल्यास त्यांच्यावर याच प्रकारे कारवाई केली जाईल असे देखील यावेळी सांगण्यात आल आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here