पालकांची कोचिंग क्लासेसकडे पाठ ; होम ट्यूशनला पसंती

0
58

– गायत्री शेलार
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; जगात कोरोनाने थैमान घातलेला असतांना त्याचा विपरीत परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवर झाला आहे. कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे सर्व शाळा, विद्यापीठे बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षण व अभ्यासावर याचा परीणाम झाला. जवळ जवळ बऱ्याच भागात अनलॉक झाले, असले तरी कोचिंग क्लासेस वर कोविड मुळे सावट कायम आहे.

जगातील महाभयंकर कोरोना साथी नंतर मानव जीवनावर अनेक परिवर्तनशील बदल झालेत, यात शैक्षणिक क्षेत्रात पालकांनी आपल्या पाल्यांकरीता कोचिंग क्लासेस पेक्षा खाजगी ‘होम ट्यूशन’ ला पसंती दिली आहे. या प्रकारात पालक समाधानी आहेत मात्र, विद्यार्थी यात समाधानी नाहीत. जे एकत्रित शिक्षण घेण्याची मजा विद्यार्थ्यांमध्ये असते ती होम ट्यूशन मध्ये नसल्याची भावना अनेक विद्यार्थी बोलून दाखवता. पूर्वी ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धत अस्तित्वात होती, कालांतराने शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झालेत. तो आजतागायत सुरू आहे.

लोकांच्या मनात कोरोनाची भिती अजूनही असल्याने, कोचिंग क्लासेस मध्ये एकुणच गर्दीच्या ठिकाणी विद्यार्थी सोशल डिस्टिंगशन सारखे नियम पाळतीलच असे ही नाही, ह्या भीतीनेही पालक कोचिंग क्लास पेक्षा पर्सनल होम ट्यूशन हा पर्यायी उपाय अवलंबवताना दिसत आहेत. काही खाजगी संस्था ही असे खात्रेशीर पर्सनल होम ट्यूशन आपणास उपलब्ध करून देतात. मुख्यत्वे ते घरी येऊन विद्यार्थ्याना शिकवत असल्याने पालकांनच्या मनात आपल्या पाल्याची सुरक्षतेची खात्री आणि नजरे समोर आपल्या पाल्याचा अभ्यास होत असल्याचे समाधान असते.

खाजगी होम ट्यूशन ह्या सकंल्पनेमुळे शिक्षक तसेच विविध विषयात पारंगत असे अनेक पदवीधर किंवा शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पार्ट टाईम जॉब म्हणून पर्सनल होम ट्यूशनचा जॉब करतात. एकुणच खाजगी होम ट्यूशन हा शैक्षणिक क्षेत्रा करीता एक चागंला आर्थिक पर्याय उपजीविका भागवण्यासाठी झाला आहे..


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here