देवळा शहरात राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा

0
12
देवळा येथे रामनवमी निमित्ताने उपस्थित गटनेतेसंजय आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार,नगरसेवक करण आहेर आदी तर दुसऱ्या छाया चित्रात मिरवणुकीत सहभागी तरुण वर्ग (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : शहरात राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्ताने येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती . सायंकाळी संपूर्ण शहरातून रथाची मिरवणूक काढण्यात आली.

देवळा येथे रामनवमी निमित्ताने उपस्थित गटनेतेसंजय आहेर माजी उपनगराध्यक्ष अतुल पवारनगरसेवक करण आहेर आदी तर दुसऱ्या छाया चित्रात मिरवणुकीत सहभागी तरुण वर्ग छाया सोमनाथ जगताप

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . मिरवणुकीत देवळा शहरातील पुरुष ,महिला व युवक सामील झाले होते . राम मंदिरात भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . प्रभू रामचंद्र , सीतामाता, लक्ष्मण ,हनुमाची वेशभूषा बालकांनी साकारली . राम भक्तांनी भगव्या टोप्या घालून उत्सव साजरा केला . यावेळी गटनेते संजय आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार , नगरसेवक करण आहेर ,हितेश आहेर, काका शिंदे , प्रतीक आहेर ,राजेंद्र आहेर, अशोक आहेर आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here