द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नितीन गुंजाळ) ; दीपावलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाच्या (MTS) डिजिटल दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCM) कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पुणे येथील अल्पसंख्यांक आणि प्रौढ शिक्षण संचालनालय चे उपसंचालक डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी तंत्र दीपोत्सव 2021 च्या फ्लिप बुक चे ऑनलाइन प्रकाशन केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र भरातील शिक्षकांनी ऑनलाइन उपस्थिती लावली.
MTS समूह विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षित करतो, याबाबत डॉ. वायूनंदन यांनी समाधान व्यक्त केले. तर डॉ. क्षीरसागर यांनी तंत्रज्ञानाचे महत्व स्पष्ट करत तंत्रस्नेही शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली.
या दिवाळी अंकास महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी तंत्र दीपोत्सवास शुभेच्छा दिल्या. नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी एम. व्ही. कदम, नंदुरबार जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विविध जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर वर्गाने देखील शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी प्रसिद्धी प्रमुख समूहाचे जितेंद्र गवळी, अहमदनगर येथील कल्पना सुपेकर हे देखील उपस्थित होते.
तंत्र दीपोत्सवाचे संपादकीय कार्य समूहाच्या राज्य समन्वयक शारदा चौधरी, सदाशिव अत्तारकर, सुनील बडगुजर, भालचंद्र भोळे यांनी पाहिले.
तर एकूणच सर्व कार्यासाठी समूहाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम