हिरे महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी साजरी

0
37

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक पंचवटी येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यप्रंसगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यानी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करताना कर्मवीरांची दुरदृष्टी ही ऋणातून समृध्दीकडे वाटचाल करणारी होती असे मत व्यक्त करुन कर्मवीरांचा विकासाचा आलेख सांगितला. या काळात त्यानी केलेले कार्य हे अतिशय धडाडीचे आहे. काळाची गरज ओळखून शेती, सहकार, कृषी आशा विविध विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन करुन केलेल्या विकास या विषयी मार्गदर्शन करुन राजकारण न करता समाजकारन करुन शिक्षणाची  विकासाचीगंगा आदिवाशी भागात आणण्याचे काम केले आहे.

सर्वसामान्य, तळागाळातील, सर्व समाजातील लोकांचे हिताचे काम कर्मवीर भाऊसाहेब यानी केले आहे.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व सिनेट सदस्य डॉ. नंदू पवार, डॉ. सुनील पाटील, डॉ. विनीत रकिबे, डॉ. संतोष चौबे, सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here