Happy birthday Dadasaheb: निवडुन आल्यास आमदार म्हणुन नाहीतर सालदार म्हणुन काम करेल अन् ती घोषणा ठरली खरी

0
50

Happy birthday Dadasaheb: नामदार दादासाहेब भुसे हे मालेगांव तालुक्यातील जनतेला गेल्या 33 वर्षा पुर्वी शिवसेनेच्या माध्यमातुन समाजसेवेच्या रूपात या तालुक्याला मिळाले तेव्हा पासुन या तालुक्याला “देवमाणुस”च मिळाला अशी भावना येथील जनतेची झाली. (Happy birthday Dadasaheb)

तुर्कस्तानसारखा भूकंप भारतात झाला तर या राज्यांना सर्वाधिक धोका असेल

साहेबांचा जन्म सामान्य शेतकरी व तालुक्यातील मराठा समाजाचे सर्वात लोकप्रिय व्यक्तीमत्व स्वातंञ सेनानी कै.दगडू बयाजी भुसे यांच्या घरात झाला. सगळ्यात लहान पुञ साहेबांच बालपण सोमवार वार्डातील श्री.प्रकाश तालीम संघा जवळील भुसे गल्ली या निवासस्थानी गेले. आणि किशोरवयीन वय हे त्यांचा शेतमळा आग्रा रोडवरील सुपर मार्केट शेजारील शेत मळ्यात गेले. साहेबांना किशोर वयात “बुलेट”हि मोटरसायकल चालवण्याचा छंद होता साहेबांनी इंजिनीअरींग पर्यंतच शिक्षण केल. आणि ठाण्या जिल्हा येथील वाडा तालुक्यात पाटबंधारे खात्यात शासकीय सेवा केली. या दरम्यान कै.आनंद दिघे साहेबांशी संपर्क आला व त्यांनी शासकीय सेवेला राजीनामा पञ देऊन दिघे साहेबांचा आदर्श व आर्शिवाद घेऊन मालेगाव तालुक्यात दाखल झाले.

या दरम्यान साहेबांना शिवसेनेने तालुका पदाची जबाबदारी सोपवली या पुर्वी मालेगांव शहरात जातीवाद्यांची व तालुक्यात विशिष्ट एका घराण्याची मक्तेदारी होती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी या सत्ताधार्यांशी संघर्ष करीत होती “नव्या दमाचा तरूण तडफदार “तालुका प्रमुख लाभाल्यामुळे शिवसैनिकात चैतन्य पसरले या दरम्यान मालेगाव शहरात जातीय दंगल उसळली दंगल इतकी भयानक होती त्यात संपुर्ण शहर जळत होते हिंदु समाजात घबराटीचे वातावरण होते साहेबांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दंगलग्रस्ताना मदती साठी मैदानात उतरले आणि दंगल शांत होई पर्यंत मदतीचा हात चालु ठेवला दंगल ८ते१० दिवसा नंतर शांत झाली जातीवाद्यांनी घराणेशाही पुढार्यांनी शासनाच्या मदतीने खोट्या गुन्ह्यात अटकीवले आणि मालेगावातील जनतेत असंतोष निर्माण झाला. या दरम्यान विधान सभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेचा युतीचा मिञ पक्ष भा.ज.पा.ने घराणेशाहीचा ऊमेदवार दिला जनता आणि युतीच्या सर्वच कार्यकर्यांनी निर्धार केला आणि ऊमेदवार देण्याच ठरल सर्वानुमते श्री.दादासाहेबांनी अपक्ष म्हणुन उमेदवारी करावी अस जाहीर झाल आणि उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी असंख्य जनसागर भगव्या वातावरणात दाखल झाला याअसंख्य अशा जनसागराला उदेशुन साहेबांनी भाषण केल “मी शिवसेना कद्दापी सोडणार नाही आणि निवडुन आल्यास आमदार म्हणुन नाहीतर सालदार म्हणुन काम करेल”या लोकप्रिय घोषणेमुळेच साहेबांचा विजय निश्चित झाला.

शिवसैनिकांचे अफाट परिश्रम जनता जर्नादनाची साथदिली आणि मालेगांव तालुक्यात इतिहास घडला घराणेशाही मोडीत करून दादासाहेब आमदार झाले आणि जनतेला “सालदार”दिलेल वचन त्यांनी पाळले आणि सलग 4वेळेस उत्तर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आमदार झाले साहेबांनी मंञीपदाचा तोरा कधीच बाळगला नाही.

अशा महान आमच्या लोकप्रिय लोकनेता ना.दादासाहेब भुसे यांना ऊदंड आयुष्य लाभो हि आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here