देवळा येथील ‘शिवस्मारक’ 3 हजार दिव्यांनी उजळले ; नागरिकांची गर्दी

0
62

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; येथील शिवस्मारकावर बुधवारी (दि.३) रोजी तुषार निकम यांनी तीन हजार दीप प्रज्वलित करत दीपोत्सव साजरा केला . अशा या दीपोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असून हा दीपोत्सव बघण्यासाठी शिव स्मारक परिसरात देवळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .

सामाजिक कार्यकर्ते तुषार निकम व मित्र परिवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सभोवताली तीन हजार दिवे लावत अनोखा दीपोत्सव साजरा केला. दिव्यांचा झगमगाट आणि हे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी शहरवासियांची मोठी गर्दी दिसून आली. तसेच या नयनरम्य दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी स्पर्धा पहावयास मिळाली .

‘एक दिवा महाराजांसाठी’ ही संकल्पना समोर ठेवत हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक रांगोळी, रोषणाईची सजावट, फटाक्यांची आतषबाजी यामुळे शिवस्मारकाचा परिसर उजळून निघाला होता. यावेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी या उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले तर इथून पुढे प्रत्येक वर्षी हा दीपोत्सव साजरा केला जाईल असे शिवस्मारकाचे संकल्पक तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी यावेळी सांगितले. या दीपोत्सव प्रसंगी शिवसंग्राम पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर, जितेंद्र आहेर, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, लक्ष्मीकांत आहेर, भाऊसाहेब पगार , संभाजी आहेर, कौतीक पवार, डॉ प्रशांत निकम, योगेश वाघमारे , नानू आहेर, हर्षद भामरे ,किशोर आहेर, भाऊसाहेब आहेर, ज्ञानेश्वर उर्फ बंडू आहेर, विलास निकम, मनोज आहेर ,आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, दीपोत्सव समितीचे कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here