Nashik : सौभाग्याचे प्रतीक हळदीकुंकू हिंदू संस्कृतीमध्ये सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसात सौभाग्यवती महिला एका ठिकाणी एकत्रित होऊन हळदी कुंकू लावून एकमेकांना वाण देतात. संक्रांतीनंतर चालणाऱ्या या व्रतवैकल्यास सौभाग्यवती महिला उत्साहाने साजरा करतात.
पंचवटी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र- येथे दिनांक 21 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात ब्रह्माकुमारी पुष्पादिदी ने कार्यक्रर्मांसाठी अनेक मान्यवर महिलांनी आवर्जून उपस्थिती दाखवली यात विशेषतः मिसेज इंडिया इंटरनेशनल शिल्पी अवस्थी, पोद्दार मेडिकल कॉलेज वरळी, मुंबई येथील प्रोफेसर डॉ माधुरी पाचघरे, आयुर्वेद सेवा संघ गणेशवाड़ी हॉस्पिटल प्रोफेसर डॉ अनघा उनवेकर, आंतरराष्ट्रीय लेखिका व निवेदक मानसी कावळे, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ. माधवी संदिपबापु पाटील, जिम ट्रेनर चैताली पाटिल, मीनु राजपूत , भारती राजवाड़े, चन्द्रकला धुमाळ, सौ. बिरारी, राधिका देशमुख, वैशाली भोसले आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमात कादवा साखर कारखान्याचे संचालक
सुनिलभाऊ केदार यांनी डिप्रेशनच्या व्यक्तीसाठी सुरू केलेल्या हेल्पलाइन ची माहिती दिली. गायक ब्रह्माकुमार ओमकार यांनी सुमधुर भावगीत प्रस्तुत करून सर्वांना आंतरिक जगाची सफर घडविली. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी ब्रह्माकुमार सतीश भाई, विनोद भाई जैन, विशाल शहा, कोमल शहा, संगीता खैरनार, स्वाती जाधव आदींनी सहकार्य केले.
येथील अध्यात्मिक रहस्य ऐकल्यानंतर अनेकांना ब्रह्माकुमारी संस्थेच्या इतरही कार्यकलापाविषयी माहिती घेण्याची उत्सुकता झाली. यासाठी त्रिदिवसीय राजयोग शिबिर पंचवटी सेवा केंद्रात सुरू करण्यात आले आहे अशी माहिती ब्रह्माकुमारी पुष्पादीदी यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम