युवा पत्रकार हरीश शर्मा यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

0
43

नांदगाव : येथील वृत्तपत्र युवा पत्रकार हरीश शर्मा यांचा अप्रति मीडिया” च्या वतीने देण्यात येणाऱ्या बीट जर्नालिझम साठीचा यंदाच्या “चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्काराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सन्मानित करण्यात आले.

राज्यभरातील माध्यमांच्या प्रतिनिधींचा २०२०-२०२१ या दोन वर्षांमध्ये केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण वेब आणि संवादद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी बद्दल बजावलेल्या कामगिरीची दखल घेत अप्रतिम मीडिया”च्या वतीने आज राज्यस्तरीय सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात हा गौरव करण्यात आला विविध वृत्त गटातून युवा क्षेत्र वृत्त प्रकारात नांदगावचे भूमिपुत्र पत्रकार हरीश शर्मा यांचे नामांकन निवड समितीने निश्चित केले होते.

महाराष्ट्र एज्युकेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे उपाध्यक्ष अजय आशर, सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर विवेक देशपांडे, रणजित कक्कड, संचालक डॉ. अनिल फळे, संचालिका प्रीतम फळे, राहुल शिंगवी, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. पुरस्काराबद्दल सर्वत्र स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here