वासाळी येथिल डांगी जनावरांच्या प्रदर्शनास जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील ; आजपासून भरणार भव्य प्रदर्शन

0
9

राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या कालखंडानंतर गेल्या दोन- तीन वर्षांपासून राज्यभरात डांगी जनावरांचे प्रदर्शनावर निर्बंध आले होते. अगोदर कोविड आणि त्यानंतर लम्पि सारख्या रोगामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

नुकत्याच सरत्या गत वर्षी देखील पाळीव जनावरांच्या लम्पि आजाराचे वाढते संक्रमण व प्रादुर्भावामुळे संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे तर सर्वत्र राज्यभर बैल बाजार व प्रदर्शने ,बैलगाडा शर्यती बंद होत्या सध्या स्थितीत जरी लम्पि आजाराचे संक्रमण कमी झाले असले तरी अनेक ठिकाणी बैल बाजार, डांगी जनावरांचे प्रदर्शन भरविणे यावर निर्बंध केले जातात परंतु सरत्या वर्षाला निरोप देत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निंवडणुकीत मोठ्या मताधिक्याने दणदणीत दुसऱ्यांदा विजय संपादन करत आदर्श सरपंच पद भूषविणारे वासाळी ग्रामपंचायत चे सरपंच काशिनाथ कोरडे यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आपल्या वासाळी येथे आपल्या संकल्पनेतून वासाळी येथे गावच्या जय भवानी माता, अंबिका यात्रा उत्सवानिमित्त सुरु केलेल्या देशी डांगी व संकरित बैल जनावरांच्या भव्य प्रदर्शनाला या नवीन वर्षात जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे.या प्रदर्शनाच्या निमित्ताने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच इगतपुरी चे आमदार हिरामणजी खोसकर व सिन्नर-इगतपुरी मतदार संघाचे कार्यकुशल आमदार माणिकराव कोकाटे यांनी काल मा.जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.

सालाबादप्रमाणे दरवर्षी वासाळी येथे जय भवानी माता- अंबिका यात्रा उत्सवानिमित्ताने होत असलेल्या देशी-डांगी संकरित जनावरांच्या भव्य प्रदर्शनाचा विषय जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला या चर्चेत दोन तीन वर्षे कोरोना व लम्पि आजारामुळे खंडित असलेले प्रदर्शन व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नाशिक चे जिल्हाधिकारी मा.डी.गंगाधरन यांनी लम्पि आजारावेळी घातलेली बंदी उठवुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे.

जिल्हाधिकाऱ्याच्या या आदेशामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये व व्यापारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी वासाळी गावचे मा.सरपंच काशिनाथ भाऊ कोरडे, नवनाथ भाऊ लहांगे शेतकरी राजाराम खादे, नाथु बाबा खादे, लक्ष्मण धांडे हे देखील उपस्थित होते. दरम्यान इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील डांगी जनावरांच्या बैल बाजार व प्रदर्शनाला जिल्हाधिकारी यांनी हिरवा कंदील दिला असून ५ जानेवारीपासून ते ७ जानेवारी पर्यंत वासाळी येथे हे प्रदर्शन होणार आहे यानिमित्ताने दोन दिवसांपासून वासाळी येथे राज्यभरातुन डांगी जनावरे बैल या प्रदर्शनासाठी येत आहे. ज्या पाळीव गुरे वासरे डांगी वळू जनावरांना लम्पि आजाराची लस दिली आहे ज्यांच्या जनावरांची पशु विभागाकडे नोंद आहे अश्याच जनावरांना या प्रदर्शनामध्ये प्रवेश देऊन प्रदर्शनात सहभाग देण्यात येणार आहे. तसेच सालाबादप्रमाणे याही वर्षी हे भव्य प्रदर्शन वासाळी येथे आम्ही आयोजित केले आहे, तरी या प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन व अशी माहिती सरपंच काशिनाथ कोरडे यांनी यावेळी दिली आहे.

या भव्य प्रदर्शनाचा गुरुवार ता.०५ जानेवारीपासून शुभारंभ होणार असून जय भवानी अंबिका यात्रा उत्सवानिमित्त रात्री ९ ते पहाटे पर्यंत देवीचा जागरण कार्यक्रम होणार आहे.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम वाद्य आदिवासी नृत्य ढोल ताशा सनई चौघडे यांच्यासह देवीची काठी ,भैरवनाथ डी जे तातळेवाडी, व रथ यात्रा मुखवटा मिरवणूक काढण्यात येणार आहे यासोबतच शुक्रवार ता.०६ सायंकाळी ९ वाजता कै विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा, व शनिवार ता.रोजी दु २ वाजता इनाम देऊन कुस्त्यांची विराट दंगल असणार आहे यासोबतच या प्रदर्शनात नाशिक जिल्हा परिषद इगतपुरी पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग अंतर्गत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे या प्रदर्शनात इगतपुरी तालुका व जिल्हा राज्य भरातून शेतकरी येणार असून डांगी ,देशी, संकरित बैल, अदात नर, गायी जनावरांची निवड परीक्षण करून योग्य ते बक्षीस पारितोषिक देखील देण्यात येणार आहे तसेच, संकरित व देशी बी बियाणे ,शेतकरी अवजारे, डिलर्स, कृषी एजन्सी, शेतकरी व महिला बचत गट, विविध एन जि ओ संस्था, तसेच कृषी संदर्भात इतरत्र स्टॉल,खेळणी पाळनि दुकाने हॉटेल व्यवसायिक याठिकाणी उपलब्ध असणार आहे.

जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये लम्पि आजार लसीकरण प्रमाणपत्र नसलेल्या जनावरांना प्रदर्शनात प्रवेश बंदी राहील याची सहभागी पशुपालक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी अशी सूचना देखील देण्यात आली आहे.

“कोविड व लम्पि आजाराच्या संक्रमनानंतर या नवीन वर्षात वासाळी येथे भव्य दिव्य असे देशी- डांगी व संकरित जनावरांचे प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दर्शविला असून या प्रदर्शनात जास्तीत जास्ती पशु पालक शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवावा असे मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो,तसेच ज्या पशुपालकांनी आपापल्या जनावरांना लम्पि आजाराचे लसीकरण केले आहे व ज्यांची नोंद पशु संवर्धन विभागाकडे आहे अश्याच पशुपालक शेतकऱ्यांना या प्रदर्शन ठिकाणी प्रवेश देऊन सहभाग नोंदवता येणार आहे.ग्रामपंचायत व आयोजक कमिटीच्या वतीने प्रदर्शनातील जनावरांना पिण्याच्या पाण्यापासून जागेपर्यंत सुविधा पुरविल्या जाणार आहे.
– काशिनाथ कोरडे ,सरपंच वासाळी ग्रामपंचायत


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here