नाशिक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंढेगावच्या जिंदाल कंपनीला आग लागली असून आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील ही घटना आहे. कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत आगीत अडकलेल्या एकूण 11 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून सुमारे 6-7 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 जणांना आगीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. जिंदाल पॉलीफिल्म नावाच्या कारखान्याच्या केमिकल स्टोरेज विभागात ही आग लागली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींची भेट घेण्यासाठी इगतपुरी येथे जाऊ शकतात तर पालकमंत्री दादा भुसे घटना स्थळी पोहचले आहेत.
अनेक लोक अडकल्याची भीती आहे
इगतपुरीतील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरही या ठिकाणी आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे हे अग्निशमन दल आणि पोलिस दलाचे प्राधान्य आहे. भीषण आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम