राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेदला जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण टाकेद-धामणगाव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या जीवघेण्या खड्डेमय रस्त्याची मोठी दुरवस्था असल्याने व पर्यायाने दुसरा मार्ग नसल्याने या भागातील स्थानिक प्रवासी-वाहन धारक,शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग व्यापारी व्यवसायिक- ग्रामस्थ नागरिकांनी अनेक वर्षांपासून ते आजपर्यंत या रस्त्यावरून खडतर प्रवास केला आणि आजही करत आहे.या भागातील जनतेने या रस्त्यांच्या दुरावस्थेसंदर्भात वेळोवेळी अनेकदा आवाज उठवला.
अनेकदा लोकप्रतिनिधी यांच्याकडे देखील मागणी केली यानंतर या रस्त्याच्या कामा संदर्भात खासदार हेमंत गोडसे,आमदार माणिकराव कोकाटे यांनी लक्ष्य घालून पाठपुरावा सुरू केला यानंतर या महत्वपूर्ण असलेल्या चार किमी लांबीच्या रस्त्याला मंजुरी मिळाली. सध्या या रस्त्याला जवळपास ५५३.८७ लक्ष निधी गेल्या चार महिन्यांपासून मंजूर आहे.१ ऑक्टोबर २०२२ रोजी या रस्त्याच्या कामाचे स्वतः प्रत्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी भूमिपूजन करत धामणगाव टाकेद फाट्यावर मंजूर रस्ता फलक, मंजूर निधी, कामाची मुदत, अशी भूमिपूजन फलक पाटी देखील लावली.
या रस्त्याचे कामकाज मक्तेदार बी टी कडलग कनस्ट्रक्शन प्रा.लि नाशिक यांना देण्यात देखील आले आहे यानंतर याच मंजूर रस्त्याचे १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी आमदार माणिकराव कोकाटे यांनी फलक लावत भूमिपूजन केले. त्यांची देखील मंजूर रस्ता फलक पाटी याठिकाणी लावण्यात आली त्यानंतर ते आजपर्यंत या रस्त्याचे काम चालू झाले नाही याची मोठी खंत या भागातील ग्रामस्थ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
यानंतर १० डिसेंबर रोजी अडसरे खुर्द गिरंगे वाडी फाट्या जवळपास या रस्त्याच्या कामाला एकाकी अचानक सुरुवात करण्यात आली यात कोरडे काँक्रीट मटेरियल वापरून शंभर दोनशे मीटर अंतराचा एक बाजूचा कच्चा रस्ता दिखावा म्हणून तयार करण्यास सुरुवात करण्यात आली.त्यानंतर ते आजपर्यंत या रस्त्याचे काम प्रलंबित राहिले आहे.या नव्याने तयार करण्यासाठी वापरलेल्या कच्च्या कोरड्या रस्त्यावरील खडीमुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी स्वरांची मोठी जिकिरीची कठीण समस्या बनली आहे.या रस्त्याच्या उखडलेल्या खडीमुळे या ठिकाणी सर्वत्र खडीचे व धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे.या कारणास्तव या खडीवरून वाहन चालविणे अत्यंत खडतर संघर्षमय जीवघेणे बनले आहे.
एकीकडे खड्डेमय रस्त्यावरून धुळीचा सामना करत धूळ खात प्रवास करणारे प्रवासी वाहनधारकांना आता याच रस्तातील खडीवरून खडतर जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. आमदार खासदार यांनी रस्त्याचे श्रेयवाद करण्यापेक्षा रस्त्याचे उत्तम दर्जाचे काम तात्काळ चालू करावे श्रेय वादाशी सर्वसामान्य आम जनतेनेला काहीही देणं घेणं नाही त्यामुळे टाकेद-धामणगाव काँक्रीट मंजूर असलेला रस्ता तात्काळ चालू करावा व उत्तम प्रतीचे काम करावे अशी मागणी टाकेद व परिसरातील प्रवासी वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे. रस्त्याचे दोन वेळा उद्घाटन झाले परंतु प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात केव्हा असा प्रश्न स्थानिक जनतेकडून उपस्थित केल्या जात आहे.
टाकेद ते धामणगाव स्त्याची परिस्थिती
अंतर ४ की मी, गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य वाहनधारकांना धुळीचे लोट सहन करत नाका तोंडात धूळ खात जीवघेणा प्रवास करावा लागतो. खड्डेमय रस्त्यामुळे या रस्त्यावरून संकटकाळात SMBT रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात येणाऱ्या गरोदर महिला माता बघिणी,जेष्ठ नागरिक व इतर अपघाती रुग्ण यांना वेळेवर उपचारसाठी पोहचविणे जिकिरीचे होते. रोज हजारो प्रवासी,पर्यटक,भाविक भक्तगण,उद्योग व्यवसायिक,हजारो शालेय विद्यार्थी, शासकीय निमशासकीय कर्मचारी नोकरदार वर्ग, वाहनधारक, शेतकरी या रस्त्यावरून रोज जीवघेणा प्रवास करतात.
टाकेद ही या परिसरातील एकमेव प्रमुख बाजारपेठ, पर्यटन स्थळ, शाळा कॉलेज असे मध्यवर्ती ठिकाण आहे. यासोबतच सर्वतीर्थ टाकेद तीर्थक्षेत्र, कळसुबाई शिखर, भंडारदरा, किल्ले विश्रामगड, रतन गड, हरिश्चंद्र गड, खेड भैरवनाथ मंदिर, किल्ले अदण मदन कुलंग, किल्ले बितनगड, टाकेद जैन श्वेतांबर सर्वोदय मंदिर अशी विविध प्रेक्षणीय पर्यटन स्थळे या भागात असल्याने याच टाकेद धामणगाव रस्त्यावरून रोज हजारो पर्यटक जीवघेणा प्रवास करत असतात. खड्डेमय रस्त्यावरून रोज छोटे मोठे अपघात होत असतात रोज अपघातांची मालिका चालूच असते. वाहनधारकांना न राहून रोज संघर्षमय मनस्ताप करत प्रवास करावा लागतो आहे.
“टाकेद-धामणगाव रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून मंजूर आहे या रस्त्याचे विद्यमान खासदार,आमदार यांनी भूमिपूजन केले याला अनेक दिवस उलटून गेले मंजूर रस्त्याचे फलक हे फक्त नावालाच लावलेले आहेत परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही याची मोठी शोकांतिका वाटते.”
– संग्राम पाटील SMBT कर्मचारी
“गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या टाकेद-धामणगाव रस्त्याला अखेर मंजुरी मिळाली याचे उद्घाटनही झाले परंतु भूमिपूजन झाल्यानंतर ते आजपर्यंत या जीवघेण्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात चांगली सुरुवात न झाल्याने या परिसरातील प्रवासी-वाहनधारक,नोकरदार वर्ग,उद्योग व्यवसायिक,चाकरमान्य, ग्रामस्थ नागरिकांकडून मोठी नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
– अँड दिलीप बांबळे टाकेद
“केवळ देखाव्यासाठी या रस्त्याच्या मध्यभागी टाकलेल्या सुके काँक्रीटमुळे त्यातील खडी उखडल्याने या रस्त्याची आणखी दयनीय धोकादायक जीवघेणी परिस्थिती बनली आहे.या रस्त्यावरून धूळ खात प्रवास तर करावा लागतोच परंतु रस्त्यावर पसरलेल्या खडीवरून दुचाकी स्वरांना वाहन चालविणे मोठा संघर्ष बनला आहे.रात्री अपरात्री SMBT याठिकाणी संकटात उपचारासाठी प्रवास करणे म्हणजे स्वतःहून मरण ओढून घेण्यासारखी परिस्थिती या रस्त्याची निर्माण झाली आहे.त्यात वाहनांची देखील अवस्था बिकट होते आहे.येत्या महाशिवरात्रीच्या दरम्यान तरी हा रस्ता पूर्ण होईल का असा प्रश्न स्थानिकांसमोर पडला आहे.
– किरण साबळे, मनसे कार्यकर्ते अडसरे बु.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम