दिंडोरी – नाशिक रस्त्यावर बर्निंग कार चा धरार

0
35

वैभव पगार
म्हेळूस्के : नाशिक-वणी महामार्गावर दिंडोरी शहरानजीक आज दुपारी नाशिक कडून वणीकडे जाणाऱ्या कार गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार योगेश प्रकाश गिरासे राहाणार होडनाथे ता.शिरपूर जि.धुळे महेंद्रा लोगन गाडी नंबर एमएच-१५,सीटी ६३३३या गाडीने नाशिकहुन वणी गडावरील देवीच्या दर्शनासाठी जात असताना दिंडोरी जवळली वनारवाडी फाट्याजवळ गाडी घेऊन आलो असताना गाडीत जळण्याचा वास येऊ लागल्याने गाडी चालक योगेश गिरासे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेत गाडीचा बोनट उघडताच त्यातून धुर निघतांना दिसला.नंतर धुराचे रूपांतर हळूहळू आगीमध्ये होऊ लागले.

आगीने अचानक प्रचंड पेट घेतल्याने आजु बाजुला नागरिक उपस्थित होते. त्या सर्व जमलेल्या नागरिकांनी व आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला परंतु नागरिकांना यश आले नाही. बघता बघता गाडी पुर्णपणे जळून खाक झाली. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र या अपघातांत जीवीत हानी टळल्याने उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरूण आव्हाड ,पोलीस हवालदार मुंढे हे करीत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here