नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पक्षांतराने देखील जोर धरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून ठाकरेंचा नाशकात घात झाल्याचे चित्र आहे. राज्यांत शिवसेनेत मोठी पडझड झाल्यानंतर नाशिक शहरात मात्र फारसे धक्के ठाकरेंना बसले नाहीत. दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) एकही माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी पक्ष सोडणार नाही, असा ठाम दावा केला मात्र तो फोल ठरला असून . राऊतांची पाठ फिरताच नाशकात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून तब्बल दहा माजी नगरसेवकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक व महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह १० माजी नगरसेवकांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला नाशकात मोठा धक्का बसला आहे. बोरस्ते यांच्या जाण्याने शिवसेनेत मोठी घडामोड समोर आली आहे.
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांमध्ये अजय बोरस्तें हे शिवसेनेचे आक्रमक तसेच अभ्यासू नेतृत्व मानले जाते त्यांचा शहरावर मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग देखील आहे. यांच्यासह, रमेश धोंगडे, सुर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, सुवर्णा मटाले, ज्योती खोले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खाडे, प्रताप मेहरोलिया यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सचिन ढिकले यांचा समावेश आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खा. हेमंत गोडसे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम