द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू झालेलेली असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे.
काही विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नसल्याने हे ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ राबविण्यात येत आहे.
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यव नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली. महाविद्यालयात विविध भागातून विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात. त्यांचे लसीकरण वेळेत पूर्ण होऊन त्यांना ऑफलाईन अध्ययनाचा आनंद घेता यावा यासाठी महाविद्यालयाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या अद्याप एकही लस न घेतलेले तसेच ज्यांची दुसरी लस घेणे बाकी आहे.
अशा विद्यार्थ्यांसाठी हे लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. काही विद्यार्थ्यांना अजून दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस पूर्ण झालेले नसल्याने त्यांचेसाठीही लसीकरण मोहीम भविष्यात आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबवली जाईल अशी माहिती महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी दिली आहे. या लसीकरण मोहिमेसाठी उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, डॉ. राकेश पाटील, डॉ. आशुतोष मोरे, लेफ्टनंट सचिन सोनवणे, डॉ. विनीत राकिबे, डॉ. संतोष चोबे, डॉ. एस. डी. पाटील यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम